मुलं हीच आपली आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे.संस्कारक्षम पिढी घडवायची असेल तर माता भगिनींनो घराघरातील टी. व्ही.च्या रिमोटवर कंट्रोल ठेवा असे आवाहन सुप्रसिद्ध कलावंत, हास्ययात्राकार शरद जाधव यांनी केले.न्यू एज्युकेशन सोसायटी सांगली संचलितवि.रा.वेलणकर बालविद्यालय सांगली या विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यस्थानी संस्थेचे अध्यक्ष अँड. जी.आर. कुलकर्णी होते.
शरद जाधव यांनी छोट्या-मोठया कथा,विनोद,नकला सादर करीत बालक व पालकांचे मनोरंजन व प्रबोधन केले.हशा व टाळ्या सोबत जीवनाला सकारात्मक दिशा देणा-या हास्ययात्रेने उपस्थितांना खळखळून हसविले.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लोंढे यांच्या हस्ते शिक्षकांनी देणगीतून उभारलेल्या संगणक कक्षाचे उदघाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गुणवंत विद्यर्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
शाळेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या पुढील मातापालकांचा गौरव करण्यात आला.स्वप्नाली विशाल जाधव ,भारती अनिल पारशेट्टी,
सौ.पुष्पा पवार ,मनीषा वाईंगडे
,पुष्पा पवार,लता लाखान यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव हिंदुराव पाटील, देणगीदार राजेंद्र वैद्य,श्वेता शेठ,संजय कुंभार,दिलिप पवार, आसगावकर,भारती जितकर,सौ.स्मिता दडगे विद्यार्थी प्रतिनिधी कु.ऐश्वर्या धनगर,चि.आयुष झेंडे,सर्व शाखांचे मुख्याद्यापक,शिक्षक,पालक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यपिका सौ. छाया नाईक यांनी,सूत्रसंचालन सौ.स्मिता नांद्रेकर यांनी, तर आभार कार्याध्यक्ष सौ वैशाली पाटील यांनी मानले.
सौ. पेटारे मॅडम, गायकवाड मॅडम, जाधव मॅडम,माळी मॅडम कोडग मॅडम, पाटील मॅडम,रमेश लोंढे, प्रविणकुमार खोत सर, माने मॅडम आदींनी संयोजन केले.
कार्यक्रम समारोप विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम प्रात्यक्षिकांनी झाला.यासाठी सायरा समलेवाले यांनी विशेष परिश्रम घेतले.