गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान प्रबोधिनी विद्यालय मिरज व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे शालेय बक्षीस वितरण सभारंभ पार पडला . या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा श्री . मोहन वनखंडे सर ,संस्थेच्या उपाध्यक्षा मा . सौ .सुमनताई खाडे मॅडम,सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेच्या प्रभाग नं .३च्या नगरसेविका मा.सौ. अनिता वनखंडे मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .सविता पाटील मॅडम , प्रज्ञा प्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका सौ.प्राजक्ता यादव मॅडम,जेष्ठ शिक्षक श्री. संतोष जाधव सर, या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थाना बक्षीस वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञान प्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका सौ . सविता पाटील मॅडम यांनी केले . संस्थेचे अध्यक्ष मा .वनखंडे सर यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील शिक्षक कु .उमा हारगे व श्री .सूर्यवंशी सर यांनी केले .कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक , विद्यार्थी , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .