सांगली जिल्ह्यातील थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे,ग. दि. माडगूळकर, सरोजिनी बाबर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे,त्याचे औचित्य साधून जिल्ह्यातील किमान शंभर गावातून नव्याने साहित्योत्सव-साहित्य संमेलन सुरु व्हावीत.अशा गावांना पुढील साहित्य संमेलनात मानपत्र देऊन गौरविण्यात येईल अशी असे आवाहन संमेलनाध्यक्ष सचिन कुसनाळे यांनी केले.
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ, शाखा-सांगली च्या वतीने मिरज येथे आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक साहित्य संमेलनामध्ये ते बोलत होते. संमेलनात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून निवडलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.संमेलनात राहुल पाटील यांच्या काव्यमध,सचिन कुसनाळे यांच्या असामान्यत्वाचा सिध्दांत, स्वातंत्र्यायण, मेरी भाव परिक्रमा, डॉ. अजित पाटील यांच्या काव्य दिनविशेष या साहित्यकृतींचे प्रकाशन करण्यात आले.मंडळामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या प्रमाणपत्रांचे वाटपही यावेळी झाले. संमेलनात झालेल्या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.अजित पाटील हे होते तर कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान राहुल पाटील यांनी भूषविले. संमेलनास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे, महापौर सौ. संगीता खोत,माजी आमदार भगवानराव साळुंखे,पोलीस उपअधिक्षक जितेंद्र जाधव,नगरसेविका सौ.वहिदा नायकवडी,साहित्यीक डॉ श्रीकांत पाटील, प्रकाश साखरे,संजय ठिगळे दयासागर बन्ने, वैभव चौगुले,अभिजीत पाटील,व्यंकटेश जंबगी, विजय जंगम,मुबारक उमराणी, श्रीधर कुदळे यांसह अनेक मान्यवर रसिक उपस्थित होते.सूत्रसंचालन सौ सुरेखा कांबळे, सौ संजीवनी कुलकर्णी,सौ मनिषा रायजादे यांनी केले.