Sanvad News क्षितिज प्रायमरी स्कूल बुरुंगवाडी मध्ये शुक्रवारी वार्षिक स्नेहसंमेलन..

क्षितिज प्रायमरी स्कूल बुरुंगवाडी मध्ये शुक्रवारी वार्षिक स्नेहसंमेलन..




    सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी ता. पलूस या संकुलातील क्षितिज प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दि.१० जानेवारी २०२० रोजी संपन्न होणार आहे.यानिमित्त दिवसभर बालक व पालकांना भव्य अशा कार्यक्रमांची मेजवानी लुटता येणार आहे.
"क्षितिज फेस्ट २०२०"या नावाने हा कार्यक्रम होणार आहे.पहिले सत्र सकाळी १० वा.सुरू होणार आहे.सुप्रसिद्ध हस्यकवी व एकपात्री कलाकार मा.श्री. बंडा जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जगभरातील रसिकांनी डोक्यावर घेतलेला त्यांचा "हास्यपंचमी" हा कार्यक्रम विद्यार्थी व पालकांना ऐकावयास मिळणार आहे. मा. श्री.दिगंबर साळुंखे,सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंबई यांच्या  अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बापू जाधव, कार्यवाह सौ.वनिता जाधव,मार्गदर्शक बाळासाहेब जाधव,ग्रामीण कथाकार विजय जाधव,बुरुंगवाडी चे सरपंच संजय माळी,वसंतराव मोरे,एम.टी. देसाई,काशीनाथ कुंभार,रमेश हजारे,प्रा. गुंडाजी साळुंखे,सुनिल माळी,दत्तात्रय चव्हाण,अजित जाधव,शिवाजी तावदर,बाळासो जाधव,मनोज कोळेकर,बजरंग जाधव,संजय जाधव आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी पहिल्या सत्रात विज्ञान,रांगोळी, हस्तकला प्रदर्शन उदघाटन,क्षितिज हस्तलिखिताचे प्रकाशन,वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
दुपारी ३ वा. दुसऱ्या सत्रास प्रारंभ होणार आहे.विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांच्या हस्ते या सत्राचे उदघाटन होणार आहे.क्षितिज फेस्ट निमित्त दिवसभर होणाऱ्या कार्यक्रमास बहुसंख्येने पालक व नागरिक उपस्थित राहणार आहेत.मुख्याध्यापक,सर्व विभागप्रमुख व शिक्षकांनी या सोहळ्याची जय्यत अशी तयारी केली आहे.
To Top