Sanvad News मिरज तालुका खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या अध्यक्षपदी अनिल उमराणी यांची निवड..

मिरज तालुका खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या अध्यक्षपदी अनिल उमराणी यांची निवड..

 

बुधगाव ता. मिरज येथील विश्वनाथराव शामराव पाटील प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. अनिल उमराणी यांची महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या मिरज तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
माजी शिक्षक आमदार भगवानराव(आप्पा)साळुंखे,पुणे विभागाचे अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे,महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे यांच्यासह स्थायी निवड समितीने सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकारणी निवडी जाहीर केल्या.

 या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी. एम.पाटील आणि पालक प्रतिनिधी सोमनाथ घाडगे यांच्या शुभहस्ते बुके देऊन अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
       यावेळी बोलताना मिरज तालुका अध्यक्ष अनिल उमराणी म्हणाले की,सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे व सर्व पदाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज तालुक्यातील खाजगी प्राथमिक शाळा व शिक्षकांच्यासाठी आपणास काम करण्याची संधी मिळाली आहे.या संधीच चीज करीत संघटना मजबूत करून शिक्षकांचा सेवक प्रतिनिधी म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन मी सेवारूपी कामकाज करण्या साठी कटिबद्ध आहे.

 यावेळी जिल्हा महिला आघाडीच्या पाटील एस. ए.  पालक दिपक कोळगे, लक्ष्‍मण महाजन, सचिन विभुते, गजानन पाटील, इत्यादी पालक  शाळेचे मुख्याध्यापक ए. व्ही.कांबळे, आदर्श माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पाटील एस.एस.,म्हारगुडे एस. ए.,जमादार वाय.जी. ,तांबोळी जे. आर., घोरपडे ए. अार.,आहिरे एन. पी. माध्यमिकचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
To Top