सिद्धविनायक शिक्षण संस्थेच्या क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन मध्ये जिमखान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पलूस तालुका क्रीडा समन्वय समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम संपन्न झाले.
मान्यवरांच्या हस्ते जिमखाना दिन फलकाचे अनावरण,क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन व ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्व अनन्य साधारण असे आहे.मोबाईल युगात मुलांनी खेळाकडे पाठ फिरविली आहे.मन,मनगट आणि मेंदूचा विकास होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खेळाशी मैत्री करा असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे जितेंद्र पाटील यांनी केले.
यावेळी माणिकचंद देसाई म्हणाले की,क्षितिज गुरुकुल संकुलातील मुलांवर झालेले संस्कार कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी योग्य आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी निवासी शाळांची नितांत गरज आहे.त्यादृष्टीने क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेने अल्पावधीतच राज्यभर नावलौकिक प्राप्त केला आहे.

विद्यार्थ्यांनी योगा,रायफल संचलन,मानवी मनोरे,मल्लखांब,आर्मी डेमो,फ्लॅग संचलन,सामूहिक सूर्यनमस्कार,कवायत,नृत्य,लेझीम,झांज,लाठीकाठी,रायफल शुटिंग,कराटे आदी खेळांची चित्तथराक प्रात्यक्षिके सादर केली.त्यास उपस्थितांनी दाद देऊन विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल बापू जाधव,कार्यवाह सौ.वनिता जाधव,मार्गदर्शक बाळासाहेब जाधव,ग्रामीण कथाकार व्ही.डी.जाधव, मलखांब प्रशिक्षक काशिनाथ कुंभार, आर्मी प्रशिक्षक वसंत (बापू) मोरे,कराटे प्रशिक्षक दिलावर डांगे,सरपंच संजय माळी, उपसरपंच शिवाजी तावदर,प्राचार्या सौ.स्वाती पाटील,मुख्याध्यापिका सौ.दिपाली जाधव आदींसह पालक,नागरिक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक संदिप नलवडे यांनी केले, वैभव गुरव यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन आश्विनी नलवडे व स्नेहलता जमदाडे यांनी केले.आभार नवनाथ सपकाळ यांनी मानले.विशाल गायकवाड,नागेश धनवडे,विशाल गुरव आदींसह सर्व शिक्षक स्टाफनी संयोजन केले.