Sanvad News साहित्यिकच मराठी चे नाव संपूर्ण जगात पोहोचवतील: कु. सानिका पाटील;विटे येथे तिसरे राज्यस्तरीय बालकुमार साहित्यसंमेलन संपन्न..

साहित्यिकच मराठी चे नाव संपूर्ण जगात पोहोचवतील: कु. सानिका पाटील;विटे येथे तिसरे राज्यस्तरीय बालकुमार साहित्यसंमेलन संपन्न..


      संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मुळे खऱ्या अर्थाने मराठी समृद्ध झाली. मराठी संस्कृतीचा दिवा तेवत ठेवायचा असेल तर भाषा आणि साहित्य टिकवले पाहिजे.आज अमेरिकेसारख्या प्रगतशील देशाला सुद्धा आपल्या मराठमोळ्या भाषेची आवड निर्माण झाली आहे. बालकुमार साहित्य संमेलनामुळे बालमनाला नवीन उभारी  मिळेल.आपण सातत्याने पुस्तके वाचली पाहिजेत व आपण आपले ज्ञान वाढविले पाहिजे असे प्रतिपादन तिसऱ्या राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा सानिका पाटील यांनी केले.
       यावेळी प्रमुख पाहुणे अभयराज तामखडे म्हणाले की , या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो हे आपले भाग्य आहे .म्हणून आपण आपली मराठी संस्कृती,मराठी भाषा वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.स्वागताध्यक्ष हर्षवर्धन मेटकरी यांनी सांगली जिल्ह्याचे मराठी साहित्यात असलेले योगदान स्पष्ट करून,संमेलनासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले .कु.शरयू मेटकरी यांनी बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. संमेलनात लहान गटातील श्रीवर्धन मेटकरी याने केलेल्या भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

         यानंतर कु.संचिता रुपनर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले.कविसंमेलनात आई, वडील, शिवाजी महाराज, देव, जीएसटी ,महापूर अशा अनेक विषयांवर कविता सादर करण्यात आल्या.कवी संमेलनास श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
          परिसंवाद सत्रात शुभांगी जानकर यांच्या अध्यक्षतेखाली ' गड आला पण सिंह गेला ' व  'कविता कशी सुचते? 'या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. यामध्ये श्रुती नवगिरे,साक्षी जाधव,सार्थक जगदाळे व सृष्टी साळुंखे यांनी सहभाग नोंदविला .संमेलनात लेखकाची मुलाखत या सत्रात सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली.कथाकथन सत्राचे अध्यक्षस्थान ऋतुजा महाडिक यांनी भूषवले. त्यामध्ये ईशा साळुंके गौरजा रंगाटे या बाल कथाकथनकारांनी बहारदार कथा सांगितल्या.

    या राज्यस्तरीय तिसऱ्या साहित्य संमेलनाचे आयोजन सौ.विजयमाला पतंगराव कदम वाचनालय विटा यांनी केले .संमेलनासाठी संस्थापक रघुराज मेटकरी अध्यक्षा रेखा शेंडगे संचालक ऋषिकेश मेटकरी सचिव वैशाली कोळेकर कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले . शिवाय राजू गारोळे,अभिजीत निरगुडे, तात्यासो शेंडगे,तोसीम शिकलगार ,शंकर कांबळे, गणेश बाबर,आसिफ मुजावर, रवी पवार, सागर वाघमारे,सुभाष होनवार, राहुल बल्लाळ,संदीप पाटोळे, सुनीता पवार, रेणुका पवार, अंजली पवार, वनिता साळुंखे,प्रतिभा रावताळे,स्वप्नाली भिंगारदिवे,प्रीती भिंगारदिवे, स्वाती कुपाडे, वैशाली  लोखंडे ,आरती चौथे, शितल बाबर इत्यादींचे सहकार्य लाभले.

To Top