जिल्हा परिषद शाळा आमणापूर ता. पलूस येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी कु. प्राची सचिन फडतरे व कु. स्नेहा मधुकर वाळवेकर यांनी कुपवाड येथील साहित्य संमेलनात सहभाग घेतला. जिल्हा परिषद व डायट सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कुपवाड येथे जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित केले होते. या साहित्य संमेलनात कु. प्राची हिच्या शेतकरी या कवितेची निवड झाली होती. तसेच शाळेची विद्यार्थीनी कु. स्नेहा वाळवेकर हीनेही साहित्य संमेलनातील लेखक आपल्या भेटीला या संवाद उपक्रमात सहभाग घेतला. शेतकरी या कवितेचे सादरीकरण उत्कृष्ट रित्या केल्या बद्दल कु. प्राची व संवाद उपक्रमात सहभाग घेतल्या बद्दल कु. स्नेहा या दोन्ही बाल साहित्यिकांचा आमणापूर येथील कवी, लेखक मा. संदीप नाझरे सर यांनी शाळेत येवून गौरव केला. लिहीत राहा असा मोलाचा संदेश देवून पुस्तक देवून अभिनंदन केले. प्राची व स्नेहा यांना शाळेतील शिक्षिका सौ. सारिका गंभीर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता मोकाशी मॅडम सौ. कविता कांबळे सौ. मनिषा रावळ सौ. ज्योती पाटील सौ. सुनिता करपे सौ. आसिफा नदाफ श्री सुरेश खारकांडे यांनी कु. प्राचीचे अभिनंदन करुन काव्य लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.