Sanvad News सौ.विजयमाला पतंगराव कदम वाचनालय मराठी साहित्यात गरुडझेप घेईल : विवेक भंडारे विटे येथे तिसऱ्या राज्यस्तरीय बालकुमार साहित्यसंमेलनास ग्रंथदिंडीने सुरवात

सौ.विजयमाला पतंगराव कदम वाचनालय मराठी साहित्यात गरुडझेप घेईल : विवेक भंडारे विटे येथे तिसऱ्या राज्यस्तरीय बालकुमार साहित्यसंमेलनास ग्रंथदिंडीने सुरवात


    मराठी भाषा मुळीच संपणार नाही.मराठी भाषेला चांगलेच दिवस येतील  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच प्राप्त होईल. सौ.विजयमाला पतंगराव कदम वाचनालयाने ज्या उत्साहाने ग्रंथदिंडी संपन्न केली,तो उत्साह मराठी भाषेला आदर्शवत असेल .या लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यात मला मराठी भाषेची प्रेरणा व स्फूर्ती दिसली,असे विचार श्री. विवेक भंडारे यांनी काढले .श्री विवेक भंडारे व  सौ.वैशाली भंडारे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले.यावेळी कांतिलाल जोगड म्हणाले, मराठी भाषेला वैश्विक रूप नक्कीच प्राप्त होणार आहे. यावेळी विष्णुपंत मंडले, अरुण लंगोटे ,बाळासाहेब पाटील,संस्थापक रघुराज मेटकरी,अध्यक्षा रेखा शेंडगे, प्राचार्या वैशाली कोळेकर,कार्यवाह योगेश्वर मेटकरी, डॉ.ऋषिकेश मेटकरी उपस्थित होते.

         विजयमाला पतंगराव कदम वाचनालयाच्या वतीने मराठी राजभाषा दिन व तिसरे राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त विटा शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे पूजन करून ग्रंथदिंडीचे सुरुवात करण्यात आली. ग्रंथदिंडीत झांज पथक ,लेझीम पथक, यासोबतच मराठी संस्कृतीची जोपासना करणारे पोशाख विद्यार्थ्यांनी परिधान केले होते.यामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज,संत मुक्ताबाई, विठ्ठल ,रुक्मिणी ,छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा गांधीजी , डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राधा,कृष्ण, सैनिक, शेतकरी यांसारख्या अनेक वेशभूषा परिधान करून विद्यार्थी ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.

       यावेळी यावेळी संमेलन अध्यक्षा सानिका पाटील, कवीसंमेलन अध्यक्षा संचीता रुपनर ,संमेलनाच्या उद्घाटक शरयू मेटकरी, संमेलनाचे प्रमुख पाहुणे अभयराज तामखडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष हर्षवर्धन मेटकरी यांसोबत सौ.विजयमाला पतंगराव कदम वाचनालयाच्या सचिव व सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर ,प्रशालेचे कार्यवाह व संमेलनाचे संयोजक योगेश्वर मेटकरी, राजू गारोळे,तात्यासो शेंडगे, अभिजीत निरगुडे,तोसीम शिकलगार ,शंकर कांबळे,गणेश बाबर, सागर वाघमारे, सुभाष होनवार, राहुल बल्लाळ, संदीप पाटोळे,सुनीता पवार, रेणुका पवार, अंजली पवार,वनिता साळुंखे, प्रतिभा रावताळे,स्वप्नाली भिंगारदेवे, पूजा जाधव, प्रीती भिंगारदेवे, स्वाती कुपाडे, वैशाली लोखंडे, आरती चोथे, शीतल बाबर यांच्यासह असंख्य बालसाहित्यिक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी व  विटा परिसरातून आलेले नागरिक उपस्थित होते.

To Top