समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा, डाॕ. सी.व्ही रमन यांच्या कार्यातून प्रेरणा घ्या ,देशाचे भवितव्य उज्वल करायचे असेल तर अंधश्रध्दाना दूर ठेवा असे आवाहन पी.डी.गुरव यांनी केले.भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अॕण्ड ज्युनि. काॕलेज भिलवडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी होते.
मुख्याध्यापिका सौ एस.एम. मन्वाचार, पर्यवेक्षक संभाजी माने, विज्ञान शिक्षक शशिकांत उंडे,संदीप सदामते,प्रमोद काकडे,सुनिल भोये,राजीव आरते, पौर्णिमा धेंडे, सुप्रिया यादव, गीता गावित सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्तविक विज्ञान विभाग प्रमुख विजय तेली यांनी केले.पाहुणे परिचय प्रल्हाद पाटील यांनी केला.सूत्रसंचालन श्वेता पाटील यांनी तर आभार पौर्णिमा धेंडे यांनी मानले.