बुर्ली येथील नम्रता चौगुले राज्य 'अविष्कार' मध्ये प्रथम.
एस.एम.जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथे नुकतेच राज्य स्तरीय आविष्कार मॉडेल स्पर्धा आणि प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या स्पर्धेत ला राज्यभरातील विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.या स्पर्धेत रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, सायन्स अँण्ड कॉमर्स कॉलेजची विद्यार्थींनी नंम्रता सुनिल चौगुले हिने उज्ज्वल यश संपादन केले.
या स्पर्धेत तिने 'वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा या प्रकारामध्ये सादर केलेल्या मॉडेलसाठी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हे मॉडेल बनविण्यासाठी चौगुले यांना डॉ. बी.ए. सोनार, प्रा. व्ही. एस. राऊत यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल तिचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, उपप्राचार्य डॉ.व्ही.बी.पाटील, उपप्राचार्य काकासाहेब भोसले यांनी अभिनंदन केले.
या यशाबद्दल नंम्रता चौगुले म्हणाली,
कॉलेजमध्ये पाककला स्पर्धेसाठी आई वडीलांच्या मदतीने ड्रायफ्रूट चॉकलेट बनवलेले. स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेला. यावेळी या चॉकलेट्सच्या मार्केटिंग संदर्भात संदीप नाझरे सरांनी मार्गदर्शन केले.
यावर अधिक अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की,
कमी खर्चात आणि प्रथिने आणि जीवनसत्त्वयुक्त असल्याने हे चॉकलेट आरोग्यासाठी उत्तम आहेत. शिवाय या प्रकारच्या चॉकलेटचे उत्पादन घेतल्यास अत्यल्प खर्चात चांगली कमाई होऊ शकते.
यामध्ये असणाऱ्या पोषणतत्वामुळे मानसिक ताणतणाव टाळण्यासाठी ही चॉकलेट अत्यंत उपयुक्त आहेत.
हे चॉकलेट घरी बनवले जात असल्याने यामध्ये कोणतेही घातक प्रिझर्वेटिव रसायने समाविष्ट नाहीत. शिवाय असे डार्क चॉकलेट खाल्याने वजन कमी होण्यास मदत होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. या आविष्कार स्पर्धेत या मॉडेलचे सादरीकरण केल्यानंतर सर्वांनाच ते आवडल्याने मला प्रथम क्रमांक मिळाला.