Sanvad News संघर्षातून मिळणाऱ्या संधीच सोन करायला शिका:- मेघना चितळे-रानडे; सेकंडरी स्कूल भिलवडी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

संघर्षातून मिळणाऱ्या संधीच सोन करायला शिका:- मेघना चितळे-रानडे; सेकंडरी स्कूल भिलवडी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


    यशाला कोणताच शॉर्टकट नसतो,मानवी जीवन संघर्षमय असले तरीही त्यातून मिळणाऱ्या संधी शोधा,स्वतः वर विश्वास ठेवून,अनुभवाच्या साथीने प्रयत्न करीत राहा तुम्ही यशस्वी व्हाल असे प्रतिपादन मेघना चितळे-रानडे यांनी केले.
          भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित  शुभचिंतन व मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.एस.एम. मन्वाचार होत्या.
                  
                 मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या स्वलेखनातून साकारलेले 'आम्ही' या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. कु. तनया चौगुले,साक्षी मांडवे, लता औताडे, प्रज्ञा पवार,वृषाली माने, ऋषिकेश टोणे,सौरभ चेंडगे आदी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
            यावेळी सौ.अनघा चितळे,उपमुख्याध्यापक एस. एन.कुलकर्णी,पर्यवेक्षक संभाजी माने,संजय मोरे आदींसह शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक विजय तेली यांनी, सूत्रसंचालन सौ.आर.झेड तांबोळी यांनी तर आभार बी.एन शिकलगार यांनी मानले.



To Top