Sanvad News शरीरातील अपंगत्वापेक्षा मनातील अपगंत्व फार वाईट:-चेतन उचितकर ; बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी येथे "ताण-तणाव" विषयी कार्यशाळा..

शरीरातील अपंगत्वापेक्षा मनातील अपगंत्व फार वाईट:-चेतन उचितकर ; बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी येथे "ताण-तणाव" विषयी कार्यशाळा..


           शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर, बाबासाहेब चितळे महाविद्यालय, भिलवडी व आर्टस व कॉमर्स कॉलेज, अग्रणी महाविद्यालय,  कडेपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मानसशास्त्र या विषयातील " ताण -तणाव " या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.प्रसिद्ध बाल समाजसेवक दिव्यांग चेतन उचितकर (वाशिम)प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. सुनिल वाळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली.

             विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चेतन उचितकर म्हणाले की, मी काहीही पाहू शकत नाही मी जन्मजात अंध आहे. मला हे जग पाहात येत नाही सकाळ, दुपार,संध्याकाळ काळा,गोरा हे काहीही माहित नाही म्हणून मी नाराज नाही. माझ्या या व्यंगावर मी मात करून तुमच्या पुढे उभा आहे. तुम्ही सुद्धा जीवनातील ताण तणाव बाजूला सारुन सारून सर्व गोष्टींना सामोरे जा व सुंदर आयुष्य जगा.

             कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुनिल वाळवेकर म्हणाले की, माणसाने तणावमुक्त जीवन जगावे, जीवनात अनेक संकटे येतात म्हणून थकून न जाता धीराने त्याला सामोरे जावे.शेतात तण व मनात ताण वाढू दिले नाही की, जीवन सुंदर बनते.दुसऱ्या सत्रामध्ये प्रा.कालिदास पाटील, इस्लामपूर यांनी ताणतणाव मुक्तीचे मार्ग सांगितले.
यावेळी चेतन उचितकर व अंध कलाकारांचा जागर जाणीवांचा हा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यकम सादर केला,त्यास उपस्थितांनी प्रतिसाद दिला.

            यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी. के. किणीकर, जयवंत केळकर,कार्यशाळेचे समन्वयक व प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत चव्हाण,सेकंडरी स्कूल भिलवडी च्या मुख्याध्यापिका सौ.शुभांगी मन्वाचार,प्रा. एस.डी. कदम,प्रा.आर.एच.भंडारे उपस्थित होते.
     या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. श्रीकांत चव्हाण यांनी केले ,सूत्रसंचालन डॉ.सुरेश शिंदे यांनी केले,आभार प्रा. विश्वास यादव यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक सर्व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी, सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर, कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
To Top