Sanvad News इ. १० वी बोर्ड परीक्षेला जाण्या-या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे...

इ. १० वी बोर्ड परीक्षेला जाण्या-या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे...


    विद्यार्थी मित्र-मैत्रीणींनो..!

             परीक्षेला जाताय ना?

                      मग पुढील गोष्टी प्रकर्षाने पाळा..!

१) परीक्षेच्या आदल्या दिवशी पूर्ण प्रकरणे न वाचता नोट्सची उजळणी करा.
२) नवीन काही वाचू नका.
३) संकेत शब्द,सूक्ष्म टिपणे, आकृत्या, नकाशे, तक्ते यांचे धावते निरीक्षण करा.
४) झोप पूर्ण व सलग घ्या. जागरण टाळा.
५) पहाटे पासूनच शांत व उत्साही वातावरणात अभ्यासाला सुरुवात करा.
६) परीक्षेला लागणाऱ्या आवश्यक साहित्याची जमवाजमव करा. सर्व साहित्य एकाच ठिकाणी ठेवा.
७) कपड्यांना इस्त्री व बुटाला पॉलीश करुन ठेवा.
८) पेपरच्या दिवशी पहाटे पासून ते सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच उजळणी करा.

 परीक्षेला निघताना पुढील काळजी घ्याः-

१) छानपैकी नास्ता करुन फ्रेश व्हा.
हलका आहार घ्यावा.(साधी पोळी, भाजी, वरणभात).
पोटभर न खाता थोडी भूक शिल्लक ठेवा.
२) परीक्षेला निघताना आवश्यक सर्व साहित्य सोबत घ्या. ओळखपत्र,हाँल तिकीट,पेन(किमान तीन), पेन्सिल, शार्पनर, स्केल, लाँगरिथम, कंपासबाँक्स, खोडरबर, पॕड, पाण्याची बाटली, रुमाल, घड्याळ,गरजेनुसार रुपये सोबत ठेवावेत.
३) रस्त्यातील वाहतूक, ट्रॕफिक जॕमचा विचार करुन योग्य वेळेत निघा.
४) सायकलने प्रवास करत असाल तर रुमाल/टोपी वापरा.मोटर सायकलने जात असाल तर हेल्मेट अवश्य घाला.
५) परीक्षेच्या अर्धा तास सेंटरवर पोहचा.

परीक्षा हॉलमध्येः-


१) परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.
२) पेपर व पालकांच्या अपेक्षा यांची चिंता सोडा. तणावमुक्त रहा.
३) हॉल तिकिट वरील सूचना काळजीपूर्वक वाचा व त्यांचे तंतोतंत पालन करा.
४) परीक्षा हॉल मध्ये प्रश्नपत्रिका हातात पडेपर्यंतचा संपूर्ण  काळ मानसिक दृष्ट्या महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा.
यासाठी मन स्थिर ठेवा. जो अभ्यास आपण केलेला आहे,तेवढे आपण निश्चितपणे लिहू शकतो यावर विश्वास ठेवा.
५) मागे काय झाले, पुढे काय होईल याची चिंता न करता शांत बसा.
कोणतीच प्रश्नोत्तरे आठवण्याचा प्रयत्न करु नका.
   

परीक्षा देतानाः-


१) शांत मनाने आधी प्रश्नपत्रिका वाचा.
२) पेपर लिहितांना लिखाणाचा वेग, वेळ आणि कोणत्या प्रश्नाला किती लिहायचे याचा अंदाज करा.
३) सोपे वाटणारे प्रश्न आधी लिहुन परीक्षेच्या मैदानावर आधी स्थिर व्हा.
४) खूप सोपे प्रश्न असतील तर खूप घाई करु नका. त्यामुळे Silly Mistakes होवू शकतात हे लक्षात ठेवा.
५) अवघड प्रश्न असेल तरी घाबरू नका. त्याला सामोरे जा. तुम्हाला ते अवघड वाटत असतील तर धीराने त्या प्रश्नाला सामोरे जा. अधिक ताण घेतला तर अधिक चूका होतात हे लक्षात ठेवा.
६) कसाही प्रश्न असेल तरी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीन.शेवटच्या आत्मविश्वासाने मी पेपर लिहीन असा निर्धार सातत्याने करा.
७) चुकूनही कॉपी करु नका. कोणी आग्रह करत असेल तरीही करु नका.
इतर विद्यार्थी कॉपी करतात तेव्हा  आपल्याला वाटते,की ते आपल्या पुढे जातील; पण अशा मुलांचा पाया कच्चा असल्याने ते भविष्यात मागे पडतात. त्यामुळे तुम्ही प्रामाणिक प्रयत्नांनी पुढे जा.

उत्तरप्रत्रिका सोडवितानाः-


१. प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत हवे.
२. निळ्या किंवा काळ्या शाईचा वापर करा.
३. बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय ,बैठक क्रमांकाची खात्री करा.
४. उपस्थिती पत्रिकावर बैठक क्रमांक, बारकोड स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी करा.
५. बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवर चिकटवा.
६. बैठक क्रमांक अंकात व अक्षरात बिनचूक लिहा.
७. उत्तरपत्रिकेवर कोणत्याही देवाचे नाव लिहू नये, अन्यथा गुण कमी होऊन एका परीक्षेस बसता येणार नाही.
८. उत्तरपत्रिकेची पाने सुस्थितीत असल्याची खात्री करा.
९. उत्तरपत्रिकेच्या पान क्रमांक तीनपासून लिहा .
१०. उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिताना खाडाखोड करू नका.
११. उत्तरपत्रिकेच्या केवळ डाव्या बाजूस  समास सोडा.
१२. उत्तरपत्रिका किंवा पुरवणीचे पान फाडू नका.
१३. उत्तरपत्रिका,पुरवणीवर पर्यवेक्षकांची स्वाक्षरी घ्या.
१४. सोपे प्रश्न लक्षात घ्या. प्रश्नांची निवड महत्त्वाची असते.
१५. विचारले तेच व तेवढेच लिहा. पेपर दिलेल्या वेळेत पूर्ण होतो .
१६.  प्रश्नांचा क्रमांक अथवा उपप्रश्न क्रमांक ठळक अक्षरात ठेवा.
१७.  उत्तराचा आराखडा मनात तयार करा.
१८.  उत्तरप्रत्रिकेवर कोठेही डाग पाडू नका.परीक्षकांसाठी सूचना लिहू नका.
१९.  मग आत्मविश्वासाने पेपर पूर्ण सोडवा.
२०. कच्चे लिखाण उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूला पेन्सिलीने करा.
२१. त्या पानावर कच्चे लिखाण असा उल्लेख करा.
२२. आकृतीसाठी साध्या पेन्सिल वापरा.
२३. शेवटच्या अर्धा तासात मुख्य उत्तरपत्रिकेवर व पुरवणी घेतली असेल तर होलोक्राफ्ट योग्य त्या ठिकाणी चिकटवा .
२४. मुख्य उत्तरपत्रिकेवरील पुरवणीचा टेबल पूर्ण करा.
२५.रिकाम्या पानावर रेषा ओढा.

पेपर झाल्यावरः-


१) पेपर नंतर उत्तरांबाबत मित्रांसोबत चर्चा टाळा.
२) किती गुण मिळतील यांची बेरीज करीत बसू नका.
३) काही उत्तरे चुकली असल्यास त्यांचा विचार न करता जे बरोबर लिहले आहे, त्यावर समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा.
४) झालेल्या पेपरची चिंता न करता  पुढच्या पेपरची तयारी सुरू करा.
५) यश तुमचेच आहे, फक्त धीर सोडू नका!

    हो पण आधी मन फ्रेश व

तणावमुक्त होण्यासाठी...

ईश्वर व माता-पिता यांचा आशीर्वाद...

घ्यायला विसरु नका!

          💐सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!💐

                       टीम ई स्कूल टाईम्स..

To Top