Sanvad News सन्मान शैक्षणिक संकुलात रंगल्या भव्य कबड्डी स्पर्धा.

सन्मान शैक्षणिक संकुलात रंगल्या भव्य कबड्डी स्पर्धा.

   सन्मान शिक्षण  संस्था सुखवाडीच्या माळवाडी येथील सन्मान शैक्षणिक संकुलात संस्थास्तरावरील सर्व शाळांमधील  इयत्ता 1 ली ते 4 थी विद्यार्थ्यांच्या भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . कबड्डी स्पर्धांचे उदघाटन कुडो राज्य पंच व राष्ट्रीय खेळाडू मा.श्री . दिलावर डांगे यांच्या हस्ते करण्यात आले . दिवसभर चाललेल्या रोमहर्षक स्पर्धेत पुढील संघांनी यश संपादन केले.

मुले ( कबड्डी)

प्रथम क्रमांक -संत ज्ञानेश्वर विद्यालय वसगडे
द्वितीय क्रमांक - संस्कार विद्यालय नांद्रे
तृतीय क्रमांक - आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे

मुली (कबड्डी)
प्रथम क्रमांक - आदर्श बालक मंदिर प्राथमिक शाळा माळवाडी
द्वितीय क्रमांक - संत ज्ञानेश्वर विद्यालय वसगडे
तृतीय क्रमांक - आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे
   
यश संपादन केलेल्या संघांना सन्मान शिक्षण संस्था सुखवाडी चे अध्यक्ष मा.प्रा. संजय यादव यांच्या हस्ते ट्रॉफी ,मेडल, व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
  या वेळी हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू सौ. आशाताई गजानन मोहिते, संत ज्ञानेश्वर विद्यालय वसगडेच्या मुख्याध्यापिका श्रीम.वैशाली साळुंखे, आदर्श प्राथमिक शाळा नागाठाण्याचे मुख्याध्यापक सुनिल मोरे,आदर्श बालकमंदिर प्राथमिक शाळा माळवाडीच्या मुख्याध्यापिका सौ. लता पाटील ,सन्मान पब्लिक स्कूल माळवाडीच्या मुख्याध्यापिका सौ.सुजाता औताडे संस्कार विद्यालय नांद्रेचे प्रमुख मा.मुजीब शिकलगार,सुबाराव बापू यादव बालशिक्षण मंदिर माळवाडीच्या बालवाडी प्रमुख सौ. प्रमिला येसुगडे सन्मान करिअर अकॅडमी माळवाडीचे प्रमुख प्रशांत जाधव, अर्जुन गेंड, वैभव यादव,सौ. सविता महिंद ,रुपटक्के सर आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मा. विकास जंगले यांनी केले तर आभार पवार सर यांनी मानले.

To Top