Sanvad News जीवनात यशस्वी होण्यासाठी ऊच्च ध्येय बाळगा:- बाळासाहेब चोपडे ;बुधगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

जीवनात यशस्वी होण्यासाठी ऊच्च ध्येय बाळगा:- बाळासाहेब चोपडे ;बुधगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

जर आपणाला यशस्वी व्हायचं असेल तर उच्च ध्येय बाळगून त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सिटी हायस्कूल व बुधगाव हाय.बुधगाव  येथील १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यानमालेत बोलताना बाळासाहेब चोपडे यांनी सांगितले. ४० शाखा सह सांगली जिल्ह्यामध्ये शै.क्षेत्रातआदर्श काम करत  असलेली सांगली शिक्षण संस्था या सांगली शिक्षण संस्थेच्या मातृ शाखेमध्ये इतिहास विषयाच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते .

पं.विष्णू दिगंबर पलूसकर विदयालयातील इतिहास विषयाचे शिक्षक तसेच राज्य कमिटी सदस्य व मॉडरेटर या पदावर काम करत असताना कशा पद्धतीने इतिहास राज्यशास्त्राचा पेपर सोडवला पाहिजे याच्या   मार्गदर्शक सूचना बाळासाहेब चोपडे यांनी दिल्या. छ.शिवाजी महाराज,स्वा.सावरकर,डाॅ आंबेडकर,आण्णा भाऊ साठे यांची उदाहरणे देऊन या महापुरूषांनी आपल्या जीवनात ऊच्च ध्येय ठेवले व त्या प्रमाणे त्यांनी प्रयत्न करून यश प्राप्त केले.जीवनात यशस्वी होण्यासाठी शाॅर्टकट नाहि.त्यासाठी प्रयत्नच केले पाहिजेत असे ते म्हणाले.         या मार्गदर्शक सूचनांचा ऊपयोग विदयार्थ्यांना नक्किच होईल व ते इतिहास राज्यशास्त्र विषयात जास्त गुण मिळवतील असे सिटी हायस्कुल चे  ऊपमुख्याध्यापक श्री जोग सर म्हणाले .आभार पवार सर यांनी माणले.संस्थेचे जेष्ठ संचालक मा.भिडे साहेब यांच्या हस्ते आभारपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.

To Top