Sanvad News रामानंदनगर कॉलेजमध्ये वार्षिक क्रिडा स्पर्धा उत्साहात...

रामानंदनगर कॉलेजमध्ये वार्षिक क्रिडा स्पर्धा उत्साहात...


पलुस तालुक्यातील रामानंदनगर येथे आर्टस् सायन्स अँड कॉमर्स कॉलेज  मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.
 कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल.डी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालया अंतर्गत कबड्डी खोखो लांब उडी गोळाफेक, हॉलीबॉल आदी क्रिडा प्रकारांचा समावेश होता.


या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य.काकासाहेब भोसले, तर प्रमुख पाहुणे म्हणून  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.डी. कदम उपस्थित होते. 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद आणि कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रिडा ज्योत प्रज्वलनाने या स्पर्धेतचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेचे संयोजन जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संदेश दौंडे, व जिमखाना समितीने केले.
To Top