इचलकरंजी येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजीरे शिक्षण संस्थेच्या दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर काँलेजचा पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना , शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या प्रगल्भ अभ्यासामध्ये निरीक्षण शक्ती हा आत्मा आहे.प्रत्येक क्षेत्रात निरीक्षणशक्ती ही त्या क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्वपुर्ण ठरत असते. असे प्रतिपादन प्रसिध्द सिनेअभिनेते गायक एकपात्री कलाकार मनीष आपटे यांनी केले.
शालेय जीवनात आपल्या पाल्यातील कलेस प्रोत्साहन देऊन ती जीवंत ठेवा कारण जीवनजगताना ती कला निश्चित उपयोगी पडेल . विद्यार्थी-विद्यार्थींनीं केलेल्या विविध टाकाऊ वस्तुंचा उपयोग करुन नव्याने केलेल्या कलाकृतींच्या कलादालनाचे उदघाटन करुन ३१वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष इचलकरंजी नगरपरीषदेचे नगरसेवक राहुल खंजीरे , प्रमुख पाहुणे मनीष आपटे , प्रमुख उपस्थीत उद्योजीका लिलावती शेटे, मुख्याध्यापक एस.ए,पाटील, व्हा.चेअरमन बाळकृष्ण मुरदंडे , सेक्रेटरी शेखर पाटील , खजिनदार प्रदीप गोलंगडे यांच्या हस्ते करणेत आले.विद्यार्थी-विद्यार्थींनीं सादर केलेल्या ईशस्तवन , स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करणेत आली. प्रास्तविक पर्यवेक्षक एम. के.परीट यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डी.ए.तराळ यांनी करुन दिला. मुख्याध्यापक एस.ए.पाटील यांनी अहवाल वाचन केले.