कुडो असोसिएशन सांगली व कुडो क्लब भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने भिलवडी येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुडो स्पर्धेत सन्मान शिक्षण संस्था सुखवाडी संचलित सन्मान करिअर अँकेडमी या सैनिक पॅटर्न निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
अभिषेक संगोलकर,बापू इंगवले,गणेश पुजारी,सुशांत कुंभार यांनी प्रथम क्रमांकाचे यश प्राप्त केले.या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सन्मान शिक्षण संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष प्रा.संजय यादव,प्रशांत जाधव,दिलावर डांगे किरण आंबी यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.