Sanvad News भिलवडी शिक्षण संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न;संस्थेच्या प्रगतीसाठी सकारात्मक चर्चा..

भिलवडी शिक्षण संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न;संस्थेच्या प्रगतीसाठी सकारात्मक चर्चा..



भिलवडी शिक्षण संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीच्या वातारणात संपन्न झाली.संस्था अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न  झाली.
" भिलवडी शिक्षण संस्थेतील सर्व विभागाच्या सर्वांगिण विकासासाठी संचालक मंडळ कटीबद्ध आहे.संस्थेचे पदाधिकारी,सभासद,पालक, नागरिक यांच्या सकारात्मक मागण्यांचा विचार करून योग्य धोरणे राबवू."असे प्रतिपादन भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी व्यक्त केले.
                  सभासद महावीर मद्वाण्णा,मोहन पाटील,सचिन पाटील,अमोल चौगुले,अमोल पाटील आदींनी संस्थेच्या हिताच्या दृष्टीकोनातून विविध प्रश्न विचारले.त्यांना संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे,उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,गिरीश चितळे,प्रा.धनंजय पाटील,सचिव संजय कुलकर्णी आदींनी समर्पक उत्तरे दिली.
         उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,संचालक यशवंतराव पाटील, गिरीश चितळे,विश्वस्त जे.बी.चौगुले, डॉ.सुहास जोशी, प्रा. धनंजय पाटील,डॉ सुनिल वाळवेकर,डी.के.किणीकर,
दादासाहेब चौगुले,व्यंकोजी जाधव,संजय कदम,जयंत केळकर,मकरंद चितळे आदीमान्यवरांच्यासह सर्व विभागप्रमुख,
प्राचार्य,मुख्याध्यापक उपस्थित होते.शेवटी आभार संचालक प्रा. आर.डी. पाटील यांनी मानले.
To Top