Sanvad News पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्कार..

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्कार..

शिक्षण सेवा मंच सांगली व सांगली जिल्हा मराठी अध्यापक मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारा उपक्रमशील शाळा पुरस्कार पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर विद्यालयास  प्रदान करण्यात आला.ज्येष्ठ लेखक विष्णू वासमकर प्राचार्य आर.जी.कुलकर्णी,शिक्षण सेवा मंचचे सचिव सुभाष कवडे ,शाहीर पाटील, विठ्ठल मोहिते बजरंग संकपाळ व मान्यवरांच्या  उपस्थितीत हा पुरस्कार मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली येथे प्रदान करण्यात आला.पलूसकर विद्यालयाच्या वतीने नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वाचन अतिशय महत्वाचे आहे हे ओळखून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबवले विशेषतः  इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी वाचन प्रेरणा प्रकल्प राबवण्यात आला.यामध्ये मान्यवरांची व्याख्याने ,वाचलेल्या पुस्तकांच्या नोंदी ठेवणे, ग्रंथ प्रदर्शन, यासारखे विविध उपक्रम राबवण्यात  आले.संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे,मुख्याध्यापक टी.जे. करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक ए.के.बामणे ,बी.एन.पोतदार, एस.एस.पुदाले सौ.एस आर साळुंखे ,सौ.एस.एस. कोळी यांनी या उपक्रमांचे संयोजन केले. उपक्रमशील शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून संस्थेचे, शाळेचे कौतुक होत आहे.

To Top