Sanvad News पत्रकारिता हा समाज मनाचा आरसा आहे- पत्रकार शितलनाथ चौगुले ; बाबासाहेब चितळे महाविद्यालयात लेखन कार्यशाळा

पत्रकारिता हा समाज मनाचा आरसा आहे- पत्रकार शितलनाथ चौगुले ; बाबासाहेब चितळे महाविद्यालयात लेखन कार्यशाळा

     पत्रकारिता हा समाज मनाचा आरसा आहे असे प्रतिपादन पत्रकार शितलनाथ चौगुले यांनी केले.
 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, बाबासाहेब चितळे महाविद्यालय, भिलवडी,व कला व वाणिज्य महाविद्यालय कडेपूर, अग्रणी महाविद्यालयातंर्गत भिलवडी येथे " वृत्तपत्रिय लेखन व निबंध लेखन " कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीकांत चव्हाण होते.

यापुढे बोलताना शितलनाथ चौगुले म्हणाले की, सर्वाचे सूक्ष्म निरिक्षण करणे हा बातमीदाराचा गुण आहे, बातमी लेखन ही एक कला आहे. बातमी सत्यघटनेवर आधारित असायला हवी, चांगल्या वाईट गोष्टी समाजासमोर आणण्याचे काम बातमी करत असते. बातमीतील सत्यता समाजाचा विश्वास संपादन करत असते म्हणून बातमीत सत्यता असायला हवी.
प्रा.धनंजय भाट यांनी निबंध लेखनाचे महत्त्व,उपयुक्तता, निबंध व  शोध निबंध लिहिण्याचे तंत्र व पद्धत स्पष्ट केली.

निबंध लेखन करण्यासाठी भरपूर वाचनाची गरज आहे. वाचनामुळे माणूस घडतो असे प्रतिपादन प्रा.राजा माळगी यांनी केले.डॉ. श्रीकांत चव्हाण,डॉ.धनंजय होनमाने यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुरेश शिंदे, प्रा.संभाजी कदम  यांनी केले. तर आभार प्रा.आर.एच.भंडारे  यांनी मानले.

     यावेळी या कार्यशाळेस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस, क्रांतीसिंह नाना पाटील महाविद्यालय, वाळवा. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रामानंदननगर येथील विद्यार्थी व विद्यार्थ्यानी , प्राध्यापक उपस्थित होते.
To Top