Sanvad News किर्लोस्कर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा निकाल 100%

किर्लोस्कर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा निकाल 100%

दहावीच्या निकालात किर्लोस्कर हायस्कूलची
दैदिप्यमान निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम
किर्लाेस्करवाडी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत १०० टक्के उच्चांकी निकाल प्राप्त करून विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या किर्लोस्कर हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर काॅलेजने सांगली जिल्ह्यात गरुडभरारी घेत दैदिप्यमान यशाची वीस वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम जपली आहे.
शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, संस्कार व सामाजिक उत्तरदायित्वाच्या जोरावर वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीची मोहोर उमटविणाऱ्या विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या किर्लोस्कर हायस्कूलने इंग्रजी माध्यमाच्या दहावीच्या परीक्षेत१०० टक्के उज्ज्वल निकालाची परंपरा सलग वीस वर्षे कायम ठेवून हायस्कूलच्या यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा खोवला अाहे.
हायस्कूलचे ४३ विद्यार्थी दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.त्यातील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी सह
अतिशय नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या परीक्षेत ४३विद्यार्थ्यांना क्रीडाचे विशेष १० गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यामध्ये 

              प्रथम क्रमांक सानिका पवार ९८.४० %,


          द्वितीय क्रमांक साईराज माने ९७.४०%,


         तृतीय क्रमांक आशिष तांदळे ९७.२०% 


 एवढे गुण प्राप्त करत मिळवला आहे .
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य के.हरिंद्रनाथन, हायस्कूलचे विभागप्रमुख प्रा.यु. बी. कुलकर्णी
वर्गशिक्षक अभय बिराज, तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा सौ.प्रतिमा किर्लोस्कर, संस्थेचे सर्व विश्वस्त, विद्याधिकारी श्री विवेक कुलकर्णी, प्राचार्य के.हरिंद्रनाथन, प्रशासकीय अधिकारी सौ. सुधा मोहिते यांनी केले. १०० टक्के उज्ज्वल निकालाची परंपरा अखंडित राहिल्याने पालक वर्गासह अनेकांनी हायस्कूलचे अभिनंदन केले. गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार शिक्षण, नाविन्यपूर्ण विधायक उपक्रमाचे यशस्वी संयोजन करीत किर्लोस्कर हायस्कूलने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाटा टेक्नॉलॉजी व मायक्रोसॉफ्ट टीमसच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण कार्यान्वित केल्यामुळे पालक वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा ध्यास घेत सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत
किर्लोस्कर हायस्कूलची दमदार व नेत्रदीपक वाटचाल सुरू आहे.
To Top