Sanvad News दहावीचा निकाल जाहीर! महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल 95.30 %

दहावीचा निकाल जाहीर! महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल 95.30 %



आज दुपारी 1 वाजता mahresults.nic.in वर पाहा निकाल.

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा हा निकाल  95.30 %लागला आहे. 

यावर्षीदेखील बोर्डाच्या निकालामध्ये मुलींचं वर्चस्व पहायला मिळालं आहे. तर 9 विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. 

💯 20 विषयांचा निकाल 100% लागला आहे. मार्च 2019 च्या तुलनेत यंदा 18.20 % निकाल अधिक लागला आहे. 

गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत - 30 जुलै 2020 ते 8 ऑगस्ट 2020

छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - 30 जुलै 2020 ते 18 ऑगस्ट 2020

विभागनिहाय बोर्डाचा संपूर्ण निकाल:

▪️कोकण – 98.77 टक्के
▪️पुणे – 97.34 टक्के
▪️कोल्हापूर – 97.64 टक्के
▪️मुंबई – 96.72 टक्के
▪️अमरावती – 95.14 टक्के
▪️नागपूर – 93.84 टक्के
▪️नाशिक – 93.73 टक्के
▪️लातूर – 93.09 टक्के
▪️औरंगाबाद – 92 टक्के

महाराष्ट्रात 9 विभागीय मंडळांमध्ये 10 वीची परीक्षा होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेला 17 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली , तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.  

दरम्यान 8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
To Top