किर्लाेस्करवाडी येथील शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, संस्कार व सामाजिक उत्तरदायित्वाच्या जोरावर वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीची मोहोर उमटविणाऱ्या विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या किर्लोस्कर हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर काॅलेज, किर्लाेस्करवाडी काॅलेजने बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत १०० टक्के उच्चांकी निकाल प्राप्त करून किर्लोस्कर काॅलेजने गरुडभरारी घेतली आहे. यशस्वी विद्यार्थ्यामध्ये प्रथम क्रमांक हर्षल शिर्के ९४.६२%, द्वितीय क्रमांक स्नेहल आवटे ९३.६९%, व तृतीय क्रमांक स्वराज मुळे ८९.५४% गुण प्राप्त करत मिळवला आहे .स्नेहल आवटे हिने कॉम्प्युटर सायन्स या द्विलक्षी विषयांमध्ये २०० पैकी २०० गुण प्राप्त करून महाराष्ट्र राज्यात व बोर्डात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. हर्षल शिर्के याने गणितामध्ये १००पैकी ९९ गुण मिळवले. तसेच मेकॅनिकल मेंटेनन्स या विषयात हर्शल शिर्के व सर्वेश काेडणीकर यांनी २००पैकी १९९ गुण मिळवले. कॉलेजचे 66 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी १८ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, ४०विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी तर ८ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य के.हरिंद्रनाथन, कनिष्ठ कॉलेज विभागप्रमुख प्रा.सौ.जे. एस. पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा सौ.प्रतिमा किर्लोस्कर, संस्थेचे सर्व विश्वस्त, विद्याधिकारी श्री विवेक कुलकर्णी, प्राचार्य के.हरिंद्रनाथन, प्रशासकीय अधिकारी सौ. सुधा मोहिते यांनी केले.
संस्थेच्या सक्षम, कर्तृत्ववान व कुटुंबवत्सल नेतृत्वाखाली नव्या प्रोत्साहनात्मक योजना तसेच टाटा टेक्नॉलॉजी व मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण कार्यान्वित केल्यामुळे किर्लोस्कर काॅलेजची दमदार व नेत्रदीपक वाटचाल सुरू आहे.