लेखक-डॉ. संतोष माने सांगली.
'कृतज्ञता व्यक्त करणे' याला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच की काय, भारतीय संस्कृतीमध्ये मातृऋण, पितृऋण, गुरूऋण, समाजऋण, तसेच देशभक्ती यांना फार पूर्वी पासून अनमोल असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. दया, क्षमा, शांती, अहिंसा,समता, बंधूता आणि सहिष्णुता या नितीमूल्यांचे संवर्धान करणारी इथली माती. मानवतेची पताका जगभर पसरवणारी भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगात महान आहे. माणूस, प्राणी आणि सृष्टिचा संबंध कायम रहावा. पृथ्वीच्या गर्भातील मूलभूत संपत्तीचे तसेच पर्यावरणाचे रक्षण करुन सृष्टीगत संपत्ती जीवनाची विभूती मानून तिचा परिपोश करण्याची शिकवण भारतीय संस्कृती देते. मानवजातीला मदत करणा-या प्राण्याबाबत आदर बाळगण्याची व कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीने जपली आहे. त्याचेच प्रतिक म्हणून बैलपोळा व नागपंचमी हे सण आपण मोठया उत्साहाने साजरे करतो. तसे पाहता सण, व्रत्त, वैकल्य हे संसारी माणसाला सकारात्मक ऊर्जा देणारे असतात व त्यामुळेच मानवी जीवनात आनंद निर्माण होतो. हे सण का व कशासाठी साजरे करावयाचे तसेच या सणांच्या मागचा शास्त्रीय, अध्यात्मिक, मानसशास्त्रीय व पर्यावरणीय दृष्टीकोण समजला तर तो सण साजरा करण्याचा आनंद चिरंतन प्राप्त होईल.
भारत देशास नाग वंशीय जमातीचा समृध्द इतिहास लाभलेला आहे. प्रतिवर्षी आपण श्रावण शुध्द पंचमीला नागपंचमी साजरी करतो. या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते तर श्रावण शुध्द चतुर्थीला भाऊ नसणारी प्रत्येक महिला नागाला भाऊ मानून त्यांची पूजा करुन उपवास करते. सापांचे मानवाबरोबरच्या परोपकारी संबंधातूनच त्यांना नागदेवता म्हटले जाते. अनेक देवदेवता सोबत नागांचा मुक्त विहार दर्शविला जातो. इ. स. पू. ५ ते ६ हजार वर्षापासून भारतात नागपूजा साजरी होते. साप हा शेतक-यांचा शत्रू नसून मित्र आहे. दरवर्षी हजारो टन धान्याचा उंदरे, घूस फडशा पाडतात. त्या उदंराची साप शिकार करतात व नष्ट होणारे धान्य मानवाकरीता सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. साप हे शेतीचे, पर्यावरणाचे रक्षण करतात तसेच सापांच्या विषापासून औषध निर्मिती केली जते. अंगदुखी, कॅन्सर तसेच भूल देण्याच्या इंजेक्शनमध्ये सर्पविषाचा वापर होतो. म्हणूनच साप हा अखिल मानवजातीचा मित्र आहे. याची जाणीव ठेवून सापा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
नागपंचमीला मातीच्या नागाच्या प्रतिकृतीची मानव पूजा करतो, नेवैद्य दाखवतो परंतु अज्ञानी माणूस जिवंत साप समोर दिसल्यानंतर त्याला मारतो, ही मानव जातीची खरी शोकांतिका आहे. विषारी साप व बिनविषारी कुठला, हे ओळखता न आल्याने माणूस घाबरतो. त्याच्या या अज्ञानातूनच माणसाच्या मनात सापाविषयी भीती आणि अंधश्रद्धा निर्माण झाली आहे. समाजामध्ये सापाविषयी अनेक समज गैरसमज निर्माण झालेले असतात. यातूनच या अंधश्रद्धा मानवाच्या मनामध्ये घर करतात व अज्ञानापोठी सापांवर वार केले जातात.साप मानवाशी शत्रुत्वाने वागत नसला तरी स्वार्थी मनुष्य मात्र सापाला आपला शत्रू समजतो. सापासंबंधीच्या अज्ञान व अंधश्रध्देमुळेच सापाची भिती मानवांमध्ये अधिक वाढते. साप हा आकमक प्राणी नसून तो किंचित घाबरट व शांतताप्रिय आहे. स्वसंरक्षणांसाठी तो प्रतिकार करतो.मुळात दंश करणे हा सापाचा गुणधर्म नाही.ते त्याचे स्वसंरक्षण आहे. साप हे नेहमी गर्दी कोलाहात, गोंगाटापासून दूर राहतात. त्यामुळेच

सर्पदंशाचे प्रमाण शहरांपेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे. भारतात प्रतिवर्षी २५ ते ३५ हजार लोक सर्पदंशामुळे मृत्यू पावतात. महाराष्ट्रात सरासरी एक हजार लोक विषारी सर्पदंशाने मूत्यू पावतात. जगामध्ये सुमारे ३००० प्रकारचे साप आढळतात. त्यात काही विषारी आहेत, काही सौम्य विषारी; तर बहुसंख्य बिनविषारी आहेत. भारतात जवळ जवळ २७८ सापांच्या विविध जाती आहेत. त्यापैकी ४० प्रकारचे साप विषारी आहेत. नाग, घोणस, मन्यार, फुरसे, समुद्रसाप, पोवळा, चापडा इ. प्रमुख विषारी जाती आहेत. धामण, गवत्या, तस्कर, अजगर, मांडूळ, दिवड, पट्टेरी पान सर्प, कुकरी, वाळा, विंचू वाळा, खापरखवल्या अजगर, डुरक्या घोणस, मांडूळ, तस्कर इत्यादी साप हे बिनविषारी असतात. हरणटोळ व मांजर्या यांना निमविषारी साप म्हणतात कारण हे साप जे चावले असता आपल्याला फक्त झोप येते. इतर कोणताही त्रास होत नाही मात्र भितीपोटी हार्ट अटॅक येऊन माणसाचा मृत्यू होण्याचा संभव असतो.
विषारी व निमविषारी सापाच्या तोंडात दोन्ही डोळयोच्या मागच्या बाजूस दोन प्रमुख विषग्रंथी असतात. या विषग्रंथी दोन वेगवेगळया नलिकेद्वारे दोन सुळे दातांच्या मुळाशी जोडलेल्या असतात. ज्यावेळी हे
साप सर्पदंश करतात त्यावेळी विषग्रंथीतून विष सुळे दातांच्या मुळाशी सोडले जाते व
सर्पदंशानंतर विष दाताच्या खोबणीतून भक्ष्याच्या शरीरात सोडले जाते. विविध प्रकारचे साप हे एका दंशात २० मि. ग्रॅ. तर व्हायपर १५० ते २०० मि.ग्रॅ. विष भक्ष्याच्या शरीरात सोडतात. त्यामुळेच मूत्यू येवू शकतो. विषारी सर्पदंशामुळे मानवाची चेतासंस्था बिघडते. सर्पदंशामुळे रुग्ण अस्वस्थ होतो. छातीत धडधडते, घाम येतो, डोळयासमोर अंधारी येते. श्वास घेण्यास त्रास होतो. ज्या ठिकाणी सर्पदंश झालेला आहे तेथे दुखते, जळजळते, तो भाग बधीर होतो. त्या ठिकाणी सूज येते. सुई टोचल्या- प्रमाणे खुणा सर्पदंशाच्या ठिकाणी दिसतात. डोळयाच्या हालचाली मंदावतात, पापण्या जड होतात, डोळे स्थिर राहतात. रुग्णाचे ओठ निळे दिसू लागतात. झटके येतात, रुग्ण बेशुध्द होतो. नाग व मण्यार या सापाच्या विषाने
मज्जातंतूवर व मेंदूवर परिणाम होतो, तर फुरसे चावल्याने रक्ताच्या गुठळया होतात. सर्पदंश झालेल्या व्यक्तिवर लगेच प्रथमोपचार होणे आवश्यक असते. जर सर्पदंश झालेल्या रुग्णांवर लगेच प्रथमोपचार केल्यास त्याचा जीव वाचू शकतो. अशा रुग्णास मानसिक आधार द्यावा. साप चावलेल्या भागाची हालचाल होऊ देवू नये. जास्त हालचाल केल्योस विष शरीरामध्ये सर्वत्र लगेच पसरते. ज्या ठिकाणी साप चावला असेल तेथे एक इंचावर कापडी बंध बोधावा. तो बंध फार घट्ट बोधू नये. प्रत्येक १० ते १५ मिनीटांनी बंध सैल करत रहावे.
विषारी सर्पदंश झालेला रुग्ण मंत्रोपचारानी व मंदिरात बसल्यामुळे वाचत नाही. म्हणून रुग्णांना लगेच रुग्णालयात नेऊन योग्य ते शास्त्रीय उपचार करावेत. सर्व सर्प हे मानवापासून दूर राहणे पसंत करतात. चुकून धक्का लागून पाय पडला असता हे साप आपल्याला चावतात. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीस सर्प चावण्याचे प्रमाण हे अधिक दिसून येते. शेतीच्या पेरणीची व इतर कामांची सुरुवात यामुळे या दिवसात सर्पचाव्याच्या दुर्घटनेचे प्रमाण अधिक आहे.कारण या वातावरणात झालेल्या बदलामुळे साप नवीन जागांचा शोधात असतात. यासाठी सर्पदंश होऊ नये म्हणून थोडीशी काळजी आपणा सर्वानी घेणे गरजेचे आहे. जंगलात शेतात काम करणा-या व्यक्तिंनी रात्री टॉर्च व काठीचा आवश्य वापर करावा. डोक्यावर कॅप घालावी. गुडघ्यापर्यंत लांब जोडे व मोजे घालावेत. शेतात किंवा जंगलामध्ये जाताना प्रथमोपचार पेटी जवळ ठेवावी. त्यामध्ये कापडी बंध, चाक्. कापूस इ. साहित्य ठेवावे. सर्वप्रथम हे लक्षात घेऊयात की, जिथे उंदीर, पाल, सरडे, बेडूक, घुशी हे असतील, तिथे साप हा हमखास येणारच. म्हणून घरामध्ये उंदरे, घूस असतील तर त्याचा नायनाट करावा म्हणजे साप घरामध्ये येत नाही. साप घरामध्ये भक्ष्य शोधण्यांसाठी येतात. म्हणून घरात, घराच्या जवळ साप येऊ नयेत अशी व्यवस्था करुन घेणे. शेतात रात्री-अपरात्री जाताना काठी आपटत चालावे. आवाजाच्या कंपनाने साप रस्ता सोडून दूर जातात.घराबाहेरील रात्रीचा बल्ब हा नेहमी दरवाजा सोडून बसवावा. कारण जळता बल्ब हा रानातील किडे आकर्षित करतो व किड्यांना खायला पाल किंवा बेडूक व त्यांना खायला साप येण्याची शक्यता अधिक असते म्हणून बल्ब नेहमी कडेला बसवावा. सापांना त्रास होईल असे वागू नये. सर्प मित्राच्या साह्याने त्याना पकडून

दूर शेतात सोडून द्यावे.
सापाच्या अंगावर काळे केस असतात, सापाच्या डोक्योवर नागमणी असतात, तसेच साप पुंगीच्या व बासरीच्या तालावर नाचतात, साप दूध व लाह्या खातात, सापाच्या शरीरात हाडे नसतात, रात्री शिळ घातल्यावर साप घरात येतो, सापाला रातराणीचा वास आवडतो, सर्पदंश झालेल्या व्यक्तिला कडूनिंबाचा पाला खायला दिल्यास गोड लागतो, मांडूळसापावर मंत्रविधी केल्याने पैशांचा पाऊस पडतो,धामणीच्या शेपटीत काटा असतो. ती गायी-म्हशीच्या नाकात शेपटी घालून त्यांना मारते. धामण गायी-म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पिते,सर्पविष मंत्रोपचाराने उतरवता येते,साप धनसंपत्तीचे रक्षण करतो,गरोदर स्त्री आणि साप यांची नजरानजर झाल्यास सापाचे डोळे जातात,सापांच्या जुळ्यामधला एखादा मारला तर दुसरा साप बदला घेतो अशा अनेक अंधश्रध्दा आपल्याकडे आहेत. या सर्व अंधश्रद्धाना कोणताही शास्त्रीय आधार नाही हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. सापास कान नसतात. त्यामुळे त्यास ऐकू येत
नाही. साप मांस भक्षक असल्याने उंदीर, पाली, बेडूक हेच प्राणी खातात. सापाचा मेंदू हा मानवाप्रमाणे विकसीत नसल्याने साप कोणावर डुख धरत नाहीत. हिंदी चित्रपटातील सापांच्या कथा ह्या कपोल कल्पित असल्यामुळे अंधश्रध्दा समाजात पसरवितात. एकंदरीतच मानव क्षणोक्षणी आत्मकेंद्री वृत्तीचे दर्शन घडवत आहेत. सापाविषयी समज व गैरसमज, अंधश्रध्दा व खरी शास्त्रीय माहिती या विषयावर समाजात जाऊन प्रबोधन करून नवीन पिढी समोर ज्ञान समृद्ध आदर्श निर्माण करण्यासाठी नागपंचमी साजरी करणे गरजेचे आहे. सणाच्या निमित्ताने समाजात प्रबोधन करताना प्रामुख्याने साप हा पर्यावरणाचा प्रमुख घटक, त्याच्या विषाचे औषधामधील स्थान, अन्नसाखळीतील महत्त्व; तसेच त्याच्याबद्दल असलेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन आदी विषयावर चर्चा करून सापाविषयीचे सर्व गैरसमज दूर केले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवल्यास साप हेच शेतक-यांचे मित्र आहेत. म्हणून नाग व मानव यांची मैत्री व्हावी, स्नेह वृध्दींगत व्हावा. मानवाच्या मनातील भिती नष्ट व्हावी हा उद्देश डोळयासमोर ठेवून नागपंचमीला प्रतिकात्मक नागाची पूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. वैज्ञानिक दृष्ट्या समृद्ध असणाऱ्या नागपंचमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!