भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनि.कॉलेज भिलवडी या विद्यालयाचा मार्च २०२० मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा इयत्ता १० वी चा निकाल ९८.०१% लागला आहे.
१९ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे.
१००%गुण प्राप्त करून कु. तनया अजय चौगुले ही विद्यार्थिनी भिलवडी केंद्रात प्रथम आली आहे.
विद्यालयातील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे
. प्रथम क्रमांक -
कु.चौगुले तनया अजय. १००%
द्वितीय क्रमांक -
कु.साळुंखे सिद्धी जांबुवंत ९९.२०%
तृतीय क्रमांक -
कु.सुरवसे समृद्धी अनिल ९७.६०%
या यशाबद्दल भिलवड़ी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष बाळासाहेब चोपडे,विश्वस्त,संचालक,
सचिव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार , उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,
पर्यवेक्षक संभाजी माने व शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.