Sanvad News इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडीची सलग सहा वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा..

इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडीची सलग सहा वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा..


 भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी या विद्यालयाचा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा इयत्ता १० वी चा निकाल १००%.लागला आहे.सलग सहा शैक्षणिक वर्षे शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा विद्यालयाने निर्माण केली आहे.विद्यालयातील ११ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त  गुण प्राप्त झाले आहेत. 
विद्यालयातील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे    

                         प्रथम क्रमांक -
               कु पूर्वा सुनील कुलकर्णी ९६.६०%,
 

                         द्वितीय क्रमांक - 
                  हर्ष दिपक पाटील ९६.४०%,


                        तृतीय क्रमांक - 
                पृथ्वीराज संजय पाटील ९५.८०%.



सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष बाळासाहेब चोपडे,विश्वस्त,संचालक, सचिव, विभाग प्रमुख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले. मुख्याद्यापिका कु. विद्या टोणपे,विभाग प्रमुख, के.डी.पाटील व शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.
To Top