पंडित विष्णू दिगंबर पलूसकर ज्युनिअर काँलेजचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल 100 % इतका लागला आहे. आटर्स,काँमर्स ,सायन्स या सर्व विभागांचा निकाल 100 % लागला असून पलूस तालुक्यात शंभर नंबरी निकालाची परंपरा निर्माण करणाऱ्या विद्यालयाचे पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य टी.जे. करांडे,ज्युनिअर विभागप्रमुख सुधीर कुलकर्णी, व सर्व शिक्षक , पालक यांचे मार्गदर्शन लाभले..एकूण १८६ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. शाखानिहाय निकाल पुढीप्रमाणे.
सायन्स शाखा -
उदय अनिल मायाण्णा याने ७६.४६%टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक,अंकित विनोद जाधव याने ७३.३८ % गुण मिळवून दितीय क्रमांक, तर अभिजीत विज्ञान तुपे यांने ७३.२५ % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
काँमर्स शाखा -
कु.कोळेकर करूणा कुमार ८६.४६ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अभिजीत भीमराव सव्वाशे यांने ८५.०७ % गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. तर कु. भाविका बाळासो यादव हिने ८४.४६% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
आर्टस शाखा -
कु.वैष्णवी संजय कुंभार हिने ७४.९२ % गुण मिळवून प्रथम क्रमांक, गायत्री धनाजी निकम हिने ७१.२३ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. साधना तुकाराम माळी हिने 70 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे,उपाध्यक्ष सुनिल रावळ,सचिव जयंतीलाल शहा,संचालक विश्वास रावळ ,सर्व संचालक,प्राचार्य टी.जे.करांडे व ज्युनिअर विभागप्रमुख सुधीर कुलकर्णी व सर्व शिक्षक सहकारी,पालक यांनी अभिनंदन केले.