
भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अॕण्ड ज्युनि. काॕलेज, भिलवडी येथे उच्च माध्यमिक शालांत (१२वी) बोर्ड परीक्षा, माध्यमिक शालांत (१०वी) बोर्ड परीक्षा , भिलवडी शिक्षण संस्थेमार्फत घेतली जाणारी गणित प्राविण्य परीक्षा , राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षा (एन.एम.एम.एस.) या विविध परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. विश्वास चितळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे संचालक श्री गिरीश चितळे , जयंत केळकर उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी मन्वाचार यांनी स्वागत प्रास्तविक केले. सुत्रसंचालन के. डी. पाटील यांनी तर आभार पर्यवेक्षक संभाजी माने यांनी मानले. बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य एस. बी. चव्हाण , इंग्लिश प्रायमरी अॕण्ड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख जी. एस. साळुंखे , एस.व्ही.कुकडे, पालक,सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .