Sanvad News प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवू - प्राजक्ता कोरे; शिक्षण समितीच्या शिष्टमंडळा सोबत सकारात्मक चर्चा..

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवू - प्राजक्ता कोरे; शिक्षण समितीच्या शिष्टमंडळा सोबत सकारात्मक चर्चा..


   
 सांगली  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना सेवाजेष्ठतेने पदोन्नती देणे आदी सह अन्य प्रलंबित प्रश्न लवकरच सोडविणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य तथा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांना सांगितले.
           प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ प्राजक्ता कोरे यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षण विभागाकडील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, वरिष्ठ मुख्याध्यापक, पदवीधर विषय शिक्षक हि पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने या पदांवरील नियुक्त्या सेवाज्येष्ठतेने भरणे, आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना विनाविलंब कार्यमुक्त करणे, पदवीधर विषय शिक्षकांना दर्जावनत (रिव्हर्शन) करणे, आॅगष्ट २०१४ च्या नियुक्ती देण्यात आलेल्या पदवीधर विषय शिक्षकांना ग्रेड वेतन रुपये ४३००/- देणे, एक नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त शिक्षकांच्या अंशदान पेन्शनकडे कपात करण्यात आलेली रक्कम संबंधित  शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्ग करणे, डी.सी.पी.एस. धारक शिक्षकांचे अंशदान पेन्शनच्या हिशोब स्लिपा  देणे आणि डी.सी.पी.एस.धारक शिक्षकांना एन.पी.एस.अंशदान पेन्शनकडे वर्ग करणेची कार्यवाही करणे याविषयी कडेगांवच्या मा. सभापती मंदाताई करांडे, नंदकुमार कोरे यांनी सविस्तर चर्चा करण्यात केली असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणाल्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना या सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठीची कार्यवाही करण्याबाबत  बोलत आहे. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विविध माध्यमातून शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करताहेत यापैकी काही शिक्षकांनी आॅनलाईन शिक्षणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले याबाबत माहिती द्या अशा शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून सन्मान करुया. त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्नशील रहावे.
          यावेळी शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य तथा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, शिक्षक बॅऺकेचे चेअरमन सुनिल गुरव, तुकाराम गायकवाड, म.ज.पाटील, जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचे प्रतिनिधी कैलास चव्हाण, विनायक पाटील,धरणदास गावीत,संजय राऊत, स्नेहलता मगदूम, जिल्हा संघटक राजाराम शिंदे, शशिकांत बजबळे,यु.टी.जाधव, रमेश पाटील, बाळासाहेब आडके, दीपक कोळी, शामराव ऐवळे, श्रीकांत कुंभार, प्रविण बाड,संजय कबीर, कुबेर कुंभार, सुरेश नरुटे, विकास चौगुले, सर्जेराव लाड, ज्ञानेश्वर रोकडे महेश कनुंजे, नंदकुमार नाटेकर आदी शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
To Top