कोरोनाच्या पार्श्वभूमीवरआदर्श शिक्षण मंडळ मिरज च्या वतीने २० ऑगस्ट २०२० ते ५ सप्टेंबर २०२० या कालावधीत मीच माझ्या जीवनाचा रक्षक ही क्रांतिकारी चळवळ सुरू केली असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ.विनीता करमरकर यांनी दिली.
चीन या देशापासून सुरू झालेला कोव्हिड १९ म्हणजेच "कोरोना" या महामारीने संपूर्ण जगात हाहा:कार माजवून थैमान घातले आहे. भारतातही याचा प्रादुर्भाव वाढला असून महाराष्ट्रात, सांगली जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे व समाज भयभीत झाला आहे.
या आजारापासून संपूर्ण मुक्ती व सुरक्षित राहण्यासाठी अनेक नामवंत डॉक्टर्स, वैद्य, तज्ञ मंडळी, आरोग्य संघटना या सर्वांनीच योजलेला उपाय म्हणजे "नियमित गरम पाण्याची वाफ घेणे". " याप्रक्रियेचे फक्त रूपांतर आपण चळवळीत करीत आहोत " अशी घोषणा व आवाहन संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सौ. विनिता करमरकर यांनी १५ऑगस्ट २०२० रोजी शाळेत केलेल्या भाषणातून व्यक्त केली आहे.यासाठी स्वच्छता पाळून हात धुणे, सॅनिटायझर चा वापर करणे , सामाजिक अंतर राखूनच समाजात वावर करणे, मास्क वापरणे या गोष्टी आपण सक्तीने करतच आहोत. "दिवसातून किमानदोन वेळा गरम पाण्याची वाफ घेणे " या प्रक्रियेवर ही चळवळ सर्वांचे लक्ष वेधत आहे.
वाफ कशी घ्यावी..
दिवसातून दोन वेळा सकाळी उठल्यावर ६ते ८ च्या दरम्यान, बाहेरून आलेनंतर गरजेनुसार व रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याची वाफ घ्यावी. तोंडाने वाफ घेऊन नाकावाटे सोडावी व नाकाने वाफ घेऊन तोंडावाटे सोडावी. एका नाकपुडीने गरम वाफ घेऊन दुसऱ्या नाकपुडीने सोडावी, परत दुसऱ्या नाकपुडीने गरम वाफ घेऊन पहिल्या नाकपुडीने सोडावी.नाकातोंडाने वाफ घेण्याची ५/५आवर्तने करावी. वाफ घेण्याच्या प्रक्रियेचे निश्चयाने व चिकाटीने पालन करूया कोरोनाचे जंतू वाफेद्वारे नष्ट करून आपण कोव्हिड मुक्त मिरज शहर करूया.
या अभिनव चळवळीचा कालावधी २० ऑगस्ट २०२० पासून ५ सप्टेंबर२०२० पर्यंत आहे. आपण अथक व प्रामाणिक प्रयत्न केले तर गणपती बाप्पा आपल्याला यश देतीलच असा आत्मविश्वास बाळगून या चळवळीत सामील होऊ.
चला उठा "मीच माझा जीवन रक्षक " या आदर्श शिक्षण मंडळाने उभारलेल्या चळवळीत मिरज शहर वासियांनो सामील होऊया आणि सांगली जिल्हा कोरोनामुक्त करूया.हा संदेश सर्वांनी आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावा,असे आवाहनही संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.