भिलवडी ता. पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या संकुलात ७४ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिगच्या नियमावलीचे पालन करीत संस्थेच्या विविध शाखांमध्ये मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी.
संस्थेचे अध्यक्ष मा.विश्वास चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले." समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोठे आहे. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज निर्माण
झाली आहे असा संदेश आपल्या मनोतातून विश्वास चितळे यांनी दिला. संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.शासन परिपत्रकानुसार आयोजित केलेल्या आॕनलाइन स्पर्धांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे, विश्वस्त जे. बी चौगुले, संचालक गिरीश चितळे, प्रा.डी. एस. पाटील, सुनिल वाळवेकर, डी. के किणीकर, जयंत केळकर, संजय कदम,डी.के चौगुले,मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार,संभाजी माने,सर्व विभागाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोरे यांनी केले.
बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी.
भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीश चितळे यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाचा संदेश देताना गिरीश चितळे म्हणाले की, आपल्या देशाला अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले आहे. देशवासीयांनी एकदिलाने व एकजुटीने जसे इंग्रजांना पळवून लावले,त्याचप्रमाणे आज आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला पळवून लावू या.असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त जे.बी.चौगुले,संचालक डॉ.सुनिल वाळवेकर, जयंत केळकर, प्रा.डी.एस.पाटील, व्यंकोजी जाधव , सहसचिव मानसिंग हाके, व प्रभारी प्राचार्य डॉ एस.बी.चव्हाण, डॉ.महेश पाटील,डॉ.एस.डी.कदम आदी मान्यवरासह यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी.
व डॉ.प्रकाश गोसावी बालवाडी भिलवडी.
संस्थेचे संचालक संजय कदम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेच्या कोल्हापूर विभागीय कार्यकारिणीच्या महिला विभागप्रमुख पदी निवड झालेबद्दल प्रा.सौ. मनिषा पाटील यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्था संचालक डी.के.किणीकर,प्रा.डी.एस.पाटील,
मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, सुचेता कुलकर्णी, आदींसह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.
इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी.