Sanvad News पलूसकर शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी संपन्न.

पलूसकर शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी संपन्न.


   पंडित विष्णू  दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण  करण्यात आले.यावेळी सचिव जयंतीलाल शहा ,संचालक विश्वास रावळ,विठ्ठल देवळे,मुख्याध्यापक टी .जे.करांडे ,नगरसेवक दिलीप जाधव,संस्थेचे हितचिंतक कुमार शिंदे ,मोहन सुतार ,पालक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


   यावेळी कोरोना काळात अतिशय सुंदर काम करत असलेले पलूस पोलीस स्टेशनचे  वाहतूक निरीक्षक दत्तात्रय कामिरे( दादा )यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला..यानिमित्ताने दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .. सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
 यावेळी दत्तात्रय कामिरे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मनोगतातून सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले.


   यावेळी बोलताना अध्यक्ष उदय परांजपे म्हणाले पहिल्यांदाच कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थी समोर नाहीत. विद्यार्थ्यांविना स्वातंत्र्यदिन सोहळा ही कल्पनाच करवत नाही..शाळा बंद आहेत .शाळेत  विद्यार्थी येवू शकत नाहीत  ही फार मोठी खंत मनाला होत आहे... ज्या ज्या वेळी शाळेमध्ये पाऊल टाकतो त्या वेळी ही खंत जाणवते.विद्यार्थी हेच शाळेचे दैवत आहेत विद्यार्थीविना शाळा ही कल्पनाच करवत नाही... लवकरच कोरोनाचे संकट जावू दे.....पुन्हा एकदा शाळा बहरू दे अशी प्रार्थना करतो असे भावनिक मनोगत व्यक्त केले..


    सुञसंचालन बी.एन.पोतदार  यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय बी.डी.चोपडे  यांनी आभार ए बी पवार  यांनी मानले.संयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख ए.के.बामणे,एस.डी.सावंत,एस.एन.गस्ते , जे.ए.सुवासे यांच्यासह सर्व  शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले..
To Top