Sanvad News श्री समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा.

श्री समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा.



पलूस येथील श्री समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये ७४वा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोरोना कालावधीमध्ये अतिशय जबाबदारीने आणि अविरत काम करणारे पलूस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ दीपक सरनाईक आणि त्यांच्या पत्नी डॉ.सौ नमिता सरनाईक हे उपस्थित होते. डॉ.सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले,उपाध्यक्ष अनिल कदम,सचिव सुहासदादा पुदाले,ईश्वर सीसाल,सतीश पवार,जगन्नाथ पुदाले,महेंद्र माने,अभिजित गोंदिल आदी संस्था सदस्य उपस्थित होते.


डॉ.सरनाईक यांनी आपल्या भाषणामध्ये कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागते या विषयी सविस्तर माहिती सांगितली त्याचप्रमाणे देशसेवेसाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांचे आभार मानले. अध्यक्ष सुहास पुदाले यांनी आपल्या भाषणामध्ये कोरोना निवारण्यासाठी आपली जबाबदारी बजावीत असणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यास सदिच्छा दिल्या.कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सविता येवले,संजीवनी सुर्यवंशी व सर्व शिक्षक सर्व नियमांचे काटेकोर पालन करत उपस्थित होते. शाळेचे दैवत असणारे विद्यार्थीच या कार्यक्रमासाठी नसल्याने सुन सुन भासत होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक जितेंद्र कांबळे यांनी केले.
To Top