Sanvad News भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन;विद्यार्थ्यांच्या घरी जावून केला सत्कार..

भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन;विद्यार्थ्यांच्या घरी जावून केला सत्कार..



भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने माध्यमिक शालांत परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे संचालक डाॕ. सुनिल वाळवेकर, प्रा.आर.डी.पाटील,सचिव एस.एन. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या घरी जावून संस्थेकडून अभिनंदन पत्र व बुके देण्यात आले.


भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अॕण्ड ज्युनि. काॕलेज, भिलवडीचा निकाल ९८.०१% व इंग्लिश प्रायमरी अॕण्ड हायस्कूल भिलवडीचा दहावीचा निकाल १००% लागला आहे.


सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी मधील प्रथम तीन गुणानुक्रमकं प्राप्त विद्यार्थी कु.तनया अजय चौगुले, कु.सिध्दी जांबुवंत साळुंखे, कु.समृद्धी अनिल सुरवसे.


इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी मधील प्रथम तीन विद्यार्थी कु.पूर्वा सुनिल कुलकर्णी,चि.हर्ष दिपक पाटील,चि.पृथ्वीराज संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी संस्थेचे आजिव सदस्य मानसिंग हाके,के.डी.पाटील,सेकंडरी स्कूल अॕण्ड ज्युनि.काॕलेज च्या मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार,इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे,शिक्षक,पालक उपस्थित होते.
To Top