Sanvad News पं.विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेच्या वतीने लक्ष्मी मंदिर सांडगेवाडी येथे वृक्षारोपण.

पं.विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेच्या वतीने लक्ष्मी मंदिर सांडगेवाडी येथे वृक्षारोपण.



पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्था परिवार पलूस यांच्यावतीने लक्ष्मी मंदिर सांडगेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. विद्यालयापासून लक्ष्मी मंदिर पर्यंत सायकल चालवा- आरोग्य सांभाळा हा संदेश देत सायकल फेरी काढण्यात आली.. 


सांडगेवाडी लक्ष्मी मंदिर परिसर या ठिकाणी वृक्षारोपण प्रसंगी सांडगेवाडीचे माजी सरपंच शरद (काका) शिंदे -पाटील, त्यांचे सर्व सहकारी ,मुख्याध्यापक मा. टी.जे.करांडे (सर ), जेष्ट शिक्षक गुरव सर , सावंत सर,चोपडे सर,जि प आंबेकर वसाहतचे मुख्याध्यापक चव्हाण सर सांस्कृतिक विभाग प्रमुख बामणे सर , पोतदार सर,शिरतोडे सर,सर्व शिक्षक , सौ.नरुले मॅडम,सौ.बिराज मँडम,सौ. बागल मँडम,सौ.चव्हाण मँडम,सर्व प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज शिक्षक ,शिक्षिका उपस्थित होते.

यावेळी बोलताना सांडगेवाडी चे माजी सरपंच मा. शरद (काका) शिंदे म्हणाले पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कामगिरी दमदार असते. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशातून वृक्षारोपण केले. आज खऱ्या अर्थाने लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानास प्रतिसाद देत स्वच्छ भारत स्वप्न साकार करण्यासाठी गावे पहिल्यांदा स्वच्छ झाली पाहिजेत. लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. संस्थेच्या वतीने सांडगेवाडी गाव दत्तक घ्यावे अशी त्यांनी विनंती केली,यावेळी बोलताना मुख्याध्यापक टी.जे.करांडे सर म्हणाले वृक्षारोपण ही काळाची गरज आहे हे ओळखून पलूसकर विद्यालयाच्या वतीने नेहमीच वृक्षारोपणास महत्त्व दिले जाते .सांडगेवाडी लक्ष्मी मंदिर परिसर एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे . सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्याने आता लावलेली झाडे खूप चांगली येतील या उद्देशाने याठिकाणी वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले,.
संयोजन हरित सेना विभाग प्रमुख मा.गस्ते सर,कांबळे सर, पवार सर,एस.डी.सावंत सर ,सर्व स्टाफ यांनी केले.पं.विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. उदय परांजपे (साहेब) उपाध्यक्ष सुनील रावळ, सचिव जयंतीलाल शहा,संचालक विश्वास रावळ यांनी उपक्रमाचे कौतुक केले.


To Top