नुकत्याच झालेल्या दहावी च्या परिक्षेत दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या आमच्या गावची सुकन्या कुमारी सिध्दी जांबुवंत साळुंखे हिचं कौतुक करण्याचा योग आला.खरंतर दैदिप्यमान यश याअर्थाने कि आमच्या गावात यापुर्वी कुणालाही एवढे मार्क्स (99.20%) मिळाले नाहीत. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या सिध्दी ने सेकंडरी स्कूल भिलवडी केंद्रात दुसरा क्रमांक मिळविला. सिध्दी चे वडील भारती विद्यापीठाच्या सेवेत तर आई घरकाम करते, कुठल्याही खाजगी क्लासेस, शिकवण्या नाहीत, फक्त Bsc च्या तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या मोठ्या बहिणीचे थोडं फार मार्गदर्शन लाभल्याचे ती सांगते.सिध्दीला पुढे वाणिज्य शाखेत प्रवेश घेवून C A ( Chartered Accountant) व्हायचं आहे. तसं ध्येय असल्याचे तिने सांगितले. " यापुढच्या काळात आर्थिक शिस्त आणि साक्षरता गरजेची असुन प्रत्येकाला सी ए (C A) ची आवश्यकता भासणार आहे त्यामुळे तु घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत दत्ता उतळे, शरद जाधव यांनी व्यक्त केले.साहित्यभूषण म.भा.भोसले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय साळुंखे आणि हनुमान विकास सोसायटी चे विद्यमान चेअरमन सुरेश बापु साळुंखे, यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संजय मोहिते, प्रदीप साळुंखे, सुनील भोसले, शरद साळुंखे, हणमंत साळुंखे, जांबुवंत साळुंखे उपस्थित होते.