Sanvad News श्री समर्थ प्रायमरी इंग्लिश स्कूल पलूस प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल १००%

श्री समर्थ प्रायमरी इंग्लिश स्कूल पलूस प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल १००%


श्री.वसंतरावजी पुदाले (दादा)शिक्षण मंडळ परिवार पलूस संचलित श्री समर्थ प्रायमरी इंग्लिश स्कूल पलूस प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल १००% इतका लागला आहे. प्रशालेच्या दोन विदयार्थीनी सलग
 दुस-या वर्षी पलूस केंद्रात चमकल्या आहेत.एकूण ४७ विद्यार्थी या परीक्षेसाठी  बसले होते. या पैकी १४ विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादीत मध्ये उत्तीर्ण झाले. 
प्रशालेत प्रथम तीन गुणानुक्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढीप्रमाणे..

प्रथम  क्रमांक -
कु.माळी आर्या उमेश.९८%
(पलूस केंद्रात प्रथम)

द्वितीय क्रमांक -
कु .निकम वसुंधरा महेश ९७% ( पलूस केंद्रात तिसरी विभागून) 

तृतीय क्रमांक विभागून -
 कु. प्रथम प्रविण तांदळे .९६%
कु श्रृती शिवाजी नांगरे . ९६%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले  (साहेब),उपाध्यक्ष अनिल कदम,सचिव सुहास पुदाले,संचालक ईश्वर सिसाळ,पांडुरंग पुदाले,महेंद्र माने, सतिश पवार, जगन्नाथ पुदाले, अभिजीत गोंदील, मुख्याध्यापक सौ. सविता येवले (मॅडम), सौ संजीवनी सुर्यवंशी व सर्व शिक्षक सहकारी  , पालक  यांनी हार्दिक अभिनंदन केले.

  सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सविता येवले सुनिल पाटील,दत्तात्रय पाटील,सुनंदा कुभार,राजेश्वरी सुतार, सारीका बोंगाणे, भारती पाटील, जयश्री शिंदे, बंदिनी देशमुख,वैभव सदामते, सागर म्हेत्रे , सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.प्रशालेने  उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
To Top