दिनांक 24 जून व 17 ऑगस्ट 2020 च्या शासन पत्रकान्वये यापुढे covid-19 कामकाजासाठी शिक्षकांच्या सेवा अधिक्रमित करू नये,अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.सांगली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ.सुनंदा वाखारे यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे, सांगली महानगरक्षेत्र अध्यक्ष श्री. बी.जी.शिंदे,सांगली जिल्हा कार्याध्यक्ष श्री.भास्कर कुंभार, जिल्हा कार्यवाह श्री.बाळासाहेब चोपडे,कोषाध्यक्ष श्री. रमेश कोष्टी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की,गेली चार-पाच महिने कोरोना महामारी च्या प्रसंगांमध्ये जिल्ह्यातील अनेक शिक्षक चेक पोस्ट ड्युटी, Q/R सेंटर ड्युटी, कोरोना क्षेत्रातील सर्वे या सारखी कामे अतिशय प्रामाणिकपणे करत असून त्यानी प्रशासनाच्या वतीने सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी सदर मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन आश्वासन शिक्षणाधिकारी सौ.सुनंदा वाखारे यांनी दिले.