Sanvad News पलूस येथे पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांची पुण्यतिथी; भक्तीगीत गायनाने पंडितजीच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

पलूस येथे पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांची पुण्यतिथी; भक्तीगीत गायनाने पंडितजीच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.


श्रेष्ठ संगीततज्ञ पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने पं.वि.दि.पलूसकर विद्यालयात  प्रतिमापूजन मुख्याध्यापक टी.जे करांडे  संगीत शिक्षक  एस.एन.गस्ते , जगन्नाथ सुवासे यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी जेष्ठ शिक्षक विकास गुरव ,ए.जे.सावंत सांस्कृतिक विभागप्रमुख ए.के.बामणे ,बी.डी.चोपडे , प्राथमिक विद्यामंदिर, माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक उपस्थित होते..

    यावेळी प्रा,बी.एन.पोतदार सर म्हणाले पं.विष्णू दिगंबर पलूसकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक, संगीतकार होते. उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम दख्खनमध्ये किंवा महाराष्ट्रात आणली ते पं बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर होत. विष्णू दिगंबर हे त्यांचेच शिष्य होत.पं यशवंतबुवा मिराशी, पं विनायकबुवा पटवर्धन ही काही त्यांच्या शिष्यांची नावे. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता पं.पलूसकरांचे मोठे योगदान आहे.त्यांनी संगीतविषयक क्रमिक पुस्तके लिहिली.स्वरलिपी तयार केली जी 'पलूसकर-पद्धती' म्हणून ओळखली जाते. १९०१ साली "लाहोर" येथे त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. हिंदुस्तानी रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली.पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांनी  भारतीय शास्त्रीय संगीताला शास्त्रबद्ध चौकटीत बसविले आणि सर्वप्रथम त्याचे दस्तावजीकरण केले. गायनाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली... वंदे मातरम् या राष्ट्रगीताला पंडितजींच्या मुळेच लोकप्रियता मिळाली ..भारतीय संगीताची आवड सर्व स्तरातील लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले  . पंडितजींच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सर्वांना सांगितले...लवकरच पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांच्याविषयी पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले.
भावगीत ,भक्तीगीत  गायनाने पंडितजीच्या स्मृतींना विनम्र  अभिवादन केले .  संगीत शिक्षक  एस.एन.गस्ते , जगन्नाथ सुवासे,सौ,सायली मेरु, विकास कांबळे , बी.डी.चोपडे यांनी याचे सुंदर भावगीते, भक्तिगीते यांचे  सादरीकरण केले.सर्वजण यामध्ये तल्लीन झाले होते. संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे, सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले .
To Top