Sanvad News समर्थ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविला इकोफ्रेंडली गणपती बाप्पा.

समर्थ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविला इकोफ्रेंडली गणपती बाप्पा.

पलूस येथील श्री समर्थ प्रायमरी व सेकंडरी इंग्लिश स्कूल,पलूस विद्यालयाने सन २०२०-२१या शैक्षणिक वर्षात कोविड १९ मुळे शैक्षणिक वर्षामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे तरी त्यावर मात करून विद्यालयाने ऑनलाईन शिक्षण चालूच आहे.त्यामध्ये कला क्षेत्राचा ही समावेश आहे.या वर्षी इकोफ्रेंडली गणेश मूर्ती चे प्रशिक्षण ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले व त्या प्रमाणे विद्यार्थी व पालकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला,या उपक्रमामध्ये प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ संजीवनी पुदाले तसेच सेकंडरी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सविता येवले व कला शिक्षक श्री सागर म्हेत्रे यांचे सहकार्य लाभले. इकोफ्रेंडली गणपतीच्या मूर्ती बनवून विद्यालयाने पर्यावरण संवर्धासाठी राबविलेल्या या उपक्रमाचे समाजातून स्वागत होत आहे.

To Top