Sanvad News शिक्षक समितीच्या पुढाकाराने मिरजेत कोविड सेंटर सुरू; शिक्षकांच्या योगदानातून उभारलेला देशपातळीवरील पहिलाच उपक्रम- मनपा आयुक्त नितीन कपडणीस

शिक्षक समितीच्या पुढाकाराने मिरजेत कोविड सेंटर सुरू; शिक्षकांच्या योगदानातून उभारलेला देशपातळीवरील पहिलाच उपक्रम- मनपा आयुक्त नितीन कपडणीस

       
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या पुढाकाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सहकारी रुग्णालयाचा उद्घाटन समारंभ सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस साहेब ,सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार साहेब ,शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदयजी शिंदे,राज्य नेते विश्वनाथ आण्णा मिरजकर,राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, डॉक्टर विक्रम कोळेकर ,राज्य संघटक सयाजीराव पाटील ,माजी उपमहापौर प्रशांत पाटील, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका नगरसेविका गीतांजली ढोपेपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

उद्घाटप्रसंगी बोलताना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले की,सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी उभारलेले हे रुग्णालय हा देशपातळीवरील पहिलाच उपक्रम आहे. कोरोणाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, दवाखाने हाऊसफुल्ल आहेत, ऑक्सिजन बेड अभावी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.अशा महामारीच्या प्रसंगात गुरुजींनी मंडळीनी उभारलेले रुग्णालय हे समाजासाठी भूषणावह असेच आहे.कुटुंबियांच्या ममतेने  कोरोना रुग्णांची काळजी घ्या,त्यांच्यावर वेळेत उपचार करा.प्रशासन तुमच्या सोबत आहे.

शिक्षक समितीचे राज्य नेते विश्वनाथ आण्णा मिरजकर म्हणाले की,सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या पुढाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सहकारी रुग्णालयात आज मिरजेत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले.ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यकारणीतील सर्व तरुण संचालक मंडळीं  कामकाजाची धुरा उत्कृष्टरित्या सांभाळीत आहेत.शिक्षक समिती याच नेतृत्व करीत असली तरीही हे रुग्णालय सर्वच शिक्षकांचं आहे,समाजाचं आहे.जिल्ह्यातील सर्वच छोट्या मोठ्या शिक्षक संघटनांनी यामध्ये सहभागी व्हावं आपण शिक्षकांच्या व त्यांच्या परिवाराच्या निरोगी आरोग्यासाठी एक लोकचळवळ बनवू तिचा देशाला आदर्श वाटेल.


बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सहकारी रुग्णालयाचे चेअरमन राजेंद्र कांबळे म्हणाले की, शिक्षकांचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ आण्णा मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी तत्त्वावर शिक्षकांसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अंतर्गत कोविड सेंटर सुरू करून समाजाच्या सद्याच्या गरजेनुसार उपचार पद्धती उपलब्ध करून दिली आहे.गेल्या आठ दिवसात कामकाज पूर्ण करून पहिल्या टप्प्यात वीस बेड ची सुविधा केली आहे.काही दिवसात अजून वीस बेडची सोय होईल.प्राथमिक स्तरावर ऑक्सिजन पुरवठा,नियमित उपचार व रुग्णांची देखभाल केली जाणार आहे.रुग्णांकडून शासकीय दरानुसार आरोग्य सेवा मूल्य आकारले जाणार आहे.

यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, रुग्णालयाचे व्हा.चेअरमन अजित कुमार पाटील,डॉ मनन शेख, शिक्षक बँकेचे चेअरमन सुनील गुरव , व्हा. चेअरमन महादेव माळी ,खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद गावडे,अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे भानुदास चव्हाण,पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसनराव पाटील,सचिव शशिकांत भागवत ,सोलापूर जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी,शिक्षक संघाचे नेते जगन्नाथ कोळपे,सातारा शिक्षक बँक संचालक किरण यादव, मिरज तालुका आरपीआय अध्यक्ष रविंद्र कांबळे ,सहकारी रुग्णालयाचे सर्व संचालक ,सहकारी रुग्णालय सल्लागार अध्यक्ष अविनाश जकाते ,प्राथमिक शिक्षक यु. टी.जाधव ,रमेश पाटील ,बाळासाहेब आडके, तुकाराम गायकवाड ,शशिकांत बजबळे , विकासराव चौगुले, कुबेर कुंभार , प्रकाश कलादगी माजी संचालक ताजुद्दीन मुलाणी, आण्णासाहेब जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मनोज चव्हाण, सहदेव बागी,तालुकाध्यक्ष सुरेश नरुटे, राजकुमार पवार, विकासराव चौगुले, नाना महाजन, विजय पाटील, सुनील लांडगे राजेंद्र दोडमनी, सी. टी. पाटील आदी मान्यवर ,समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक यु. टी. जाधव यांनी केले. आभार संजय रोकडे यांनी मानले.

          



To Top