१४ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या विदयालयातही हा दिवस अनेक उपक्रमांनी ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक टी,जे. करांडे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून हिंदी दिवस कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने या ऑनलाईन हिंदी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .विदयार्थ्यांनी हिंदी कविता गायन.,राष्ट्रभाषा हिंदीचे महत्व या विषयावर मनोगते व्यक्त केली.विदयालयाचे मुख्याध्यापक .टी.जे. करांडे यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगितले .या आॅनलाईन हिंदी दिवस कार्यक्रमाचे आयोजन .बी.डी. चोपडे सर यांनी केले. ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये मयुरी सुतार. रीतेश सुतार, उत्कर्षा कुंभार, संचिता शिंदे ,पूजा जाधव, अंजली सूर्यवंशी,किरण सूर्यवंशी,समृध्दी चव्हाण तसेच इंग्रजीचे शिक्षक .बी.एन. पोतदार विज्ञानच्या शिक्षिका सौ.पी.यु.बिराज यांनी आपली हिंदी भाषेविषयीची मनोगते व्यक्त केली.संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे साहेब,उपाध्यक्ष सुनील रावळ (तात्या)
सचिव मा.जयंतीलाल शहा (साहेब) संचालक विश्वास रावळ यांनी हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभाग प्रमुख सौ.नरूले पी.व्ही यांनी केले. उत्साही वातावरणात हिंदी दिवस कार्यक्रम संपन्न झाला