७ सप्टेंबर रोजी निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे राज्य संघटक बाळासाहेब चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस ते हातनूर असे ५२ किलोमीटर अंतर सायकलीवरून पार केले. सायकल चालवा आरोग्य सांभाळा,प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे राज्य संघटक व पं.विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयातील शिक्षक बाळासाहेब चोपडे यांनी केले . पलूस मोराळे.. राजापूर.. विसापूर व हातनूर.. या हातनुर गावचे ग्रामदैवत होनाई या डोंगराच्या परिसरात करंज आवळा, अशोक ,या बियाण्याचे सीडबाॅल रोपण केले .सदर सायकल सफरीमध्ये दै. पुण्यनगरीचे पत्रकार सुनील पुदाले , एस टी महामंडळाचे सचिन शिंदे ,गजानन पाटील मयूर हराळे, ओंकार हराळे, राहुल कोळी सहभागी झाले होते.