लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज या प्रशालेमध्ये आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
'राजे उमाजी नाईक (जन्म: ७ सप्टेंबर १७९१ - मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते.क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे.मग हे राजे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. 'मरावे परि क्रांतिरूपे उरावे' अशी उक्ती आहे ती आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वतःच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. असे मत प्रशालेच्या नूतन उपमुख्याध्यापिका सौ.ए.ए.कुलकर्णी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपप्राचार्य जी.एम.पागे, ए.बी.पाटोळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एम. मुल्ला, जे.व्ही.खोबरे,एस.एच.माळी, ए.जी.जुगुळकर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.