Sanvad News हिवरे हायस्कूल आणि गुळवंची हायस्कूल येथे ऑनलाईन दिन उत्सहात साजरा..

हिवरे हायस्कूल आणि गुळवंची हायस्कूल येथे ऑनलाईन दिन उत्सहात साजरा..


अस्लम शेख संत तुकाराम विद्यालय हिवरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय गुळवंची  यांच्या सयुंक्त विद्यमाने ऑनलाईन शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष मा. बसवराज येलगार यांनी विद्यार्थ्यांना माजी शाळा, माजी शिक्षक यांचा आदर आणि सन्मान ठेवावा, असे आव्हान केले. सुरुवातीला हिवरे गावाचे सरपंच मा. बंडगर मॅडम आणि उपसरपंच मा. भागवत शिंदे यांनी शिक्षकांचा, शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 
सदर ऑनलाईन कार्यक्रमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले.यावेळी हिवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. बंडगर सर, गुळवंची हायस्कूलचे  मुख्याध्यापक मा. खुटाळे सर,   शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.शहाजी भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटील सर आणि पवार सर यांनी केले. यावेळी रावसाहेब खरात, तांबोळी सर, बाबर सर, गुरव सर, घोडके मॅडम चंदू पवार, राजेंद्र फोन्डे, जोतिराम कांबळे, हिवरे आणि गुळवंची गावातील बहुसंख्य पालक आणि मुले  या ऑनलाईन कार्यक्रमांस उपस्थित होते.
To Top