Sanvad News ऑनलाईन कट्टयावर लेखक आले विद्यार्थ्यांच्या भेटीला;खरशिंग व देशिंग मधील चिमुकल्यांशी संदिप नाझरे यांचा संवाद

ऑनलाईन कट्टयावर लेखक आले विद्यार्थ्यांच्या भेटीला;खरशिंग व देशिंग मधील चिमुकल्यांशी संदिप नाझरे यांचा संवाद


जिल्हा परिषद शाळा खरशिंग व देशिंग (सांगली)शाळेच्या वतीने ऑनलाइन कट्टा या उपक्रमांतर्गत मुलांशी विशेष संवाद साधला श्री.संदीप नाझरे सर प्रसिद्ध कवी,लेखक आणि पत्रकार जे इ. ६ वीच्या मराठी पाठयपुस्तकातील पण थोडा उशीर झाला पाठाचे लेखक आहेत.
जिल्हा परिषद शाळा खरशिंग व देशिंग नंबर 1 यांच्यावतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन कट्टा या उपक्रमांतर्गत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी राज्यभर ज्यांचे नाव घेतले जात असे आपल्या जिल्ह्यातील लेखक-कवी व पत्रकार श्री संदीप नाझरे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये संदिप नाझरे सरांचा एक पाठ आहे पण थोडा उशीर झाला या पाठाच्या अनुषंगाने आज प्रत्यक्ष लेखक मुलांची संवाद साधण्यासाठी उपस्थित होते. अतिशय छान मुलांशी चर्चा पद्धतीने अनुभव सांगितले. मुलांनी सरांचे प्रश्न विचारून त्यांचा लेखनातील जीवनक्रम उलगडला. अतिशय सुंदर असं हा ऑनलाइन कट्टा उपक्रम विद्यार्थ्यांना तसेच आम्हा शिक्षकांना एक वेगळा अनुभव देणारा ठरला. यावेळी बोलताना लेखक नाझरे सर बोलले की ,आईचे महत्व आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे. बालपणी आईने सांगितलेल्या अनेक लहान लहान गोष्टी तसेच अंगाई गीत हे आपल्याला भविष्यामध्ये संस्कारित नागरिक बनण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी खूप सुंदर उत्तरे आपल्या अनुभवातून दिली. पाठ्यपुस्तकातील पाठ का लिहिला याविषयी बोलताना लेखक नाझरे सर म्हणाले की. हा पाठ आहे तो माझ्या जीवनातील खरा सोसलेलाअनुभव आहे. माझे वडील सैनिक म्हणून सैन्यात असताना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाबाबत घडलेला प्रसंग पाठ रूपात इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मांडला आहे. याप्रसंगी नाझरे सरांनी विद्यार्थ्यांना कविता कशी लिहिण्यास सुचली त्याचबरोबर परिसरातील विविध पक्ष्यांची माहिती सांगितली. सामान्य विद्यार्थी असून सुद्धा धडपडीमुळे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेऊन आज लेखक म्हणून सर्वांच्या समोर दिसत आहे. असे त्यांनी सांगितले. बालभारतीतील इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांनी लेखन केलेला पाठ निवड झाली आहे हे समजल्यानंतर त्यांना त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे असे वाटले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना कविता कशा कराव्यात? निसर्गाचे निरीक्षण कसे करावे? त्यातून कोणते ज्ञान घ्यावे? याबद्दल मार्गदर्शन केले. शेवटी जाता जाता श्री नाझरे सर यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करा.निसर्गाची जपणूक करा. तसेच जे सीमेवरती आपल्या देशाचे रक्षण करत आहेत अशा सैनिकांना कधी विसरू नका. त्यांच्याशी आदराने वागा. अशी शिकवण दिली .यावेळी कवठेमहांकाळ तालुक्याचे देशिंग गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध कवी श्री. दयासागर बने सर हे उपस्थित होते. आजच्या ऑनलाईन कट्ट्यामध्ये पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांच्या बरोबरच त्यांच्या पालकांनीही सहभाग घेतला. अतिशय सुंदर असा हा उपक्रम आज उत्साहाने पार पडला. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे नियोजन शिक्षक श्री.तारीश अत्तार यांच्या कल्पनेतून साकारला.यावेळी मुख्याध्यापिका सुप्रिया शिंदे,साहेबलाल तांबोळी,अन्नाप्पा शिंदे,तारीश अत्तार संगीता कोरे,वंदना माळी, शुभांगी घाटे,अर्चना वाघमारे, स्वाती यादव व अंजुम अत्तार हे शिक्षक सहभागी होते.
To Top