शिक्षक समितीचे सांगली जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन..
सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत शिक्षक पुरस्कार तालुक्यांतील शिक्षक संख्या विचारात घेऊन जाहीर करण्यात यावेत अशी मागणी केली असल्याचे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य बाबासाहेब लाड यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व शिक्षण सभापती यांचेकडे केली आहे.
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि गुणवंत शिक्षक पुरस्कार सांगली जिल्हा परिषदेकडून जाहीर केले जातात. जिल्ह्यातील तालुक्यांतील शिक्षक संख्या कमी-जास्त प्रमाणात आहे. लहान तालुक्यातील शिक्षकांना पुरस्कार मोठ्या संख्येने कार्यरत असलेल्या तालुक्यातील शिक्षकांना पुरस्कार यामध्ये विषमता असल्याने प्रत्येक तालुक्याला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे पण ज्या तालुक्यांची शिक्षक संख्या पाचशे पेक्षा अधिक आहे त्यांना त्या पटीत तसेच कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना ही स्वंतत्र पुरस्कार जाहीर करण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षक बॅऺकेंचे संचालक शशिकांत बजबळे, तुकाराम गायकवाड, अशोक बेडगे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ प्राजक्ता कोरे शिक्षण सभापती मा.सौ.आशाताई पाटील यांचेकडे केली असता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व शिक्षण समिती सभापती यांनी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने केलेली मागणी बरोबर आहे. याबाबत आम्ही सकारात्मक विचार करून या पुढील काळात निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दयानंद मोरे, केंद्रप्रमुख अविनाश जकाते, बाळासाहेब आडके, कुबेर कुंभार, विकास चौगुले, सुरेश नरुटे, राजाराम शिंदे, विनोदकुमार पाटील, संजय रोकडे, दीपक कोळी, उत्तम पाटील, सुरेश पाटील, रामराव मोहिते, महेश कनुंजे, डी.एम.पिसे, नंदकुमार नाटेकर, संदिप कांबळे,आर.आर.सावंत आदी शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.