भिलवडी ता.पलूस येथील आर.बी.एल.बँक(रत्नाकर बँक) यांच्या वतीने भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा व कै. डॉ.प्रकाश गोसावी बालवाडी मधील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
भिलवडी शाखेचे मॅनेजर वैभव माने यांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून उपस्थित शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.भिलवडी शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य मानसिंग हाके उपस्थित होते.मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी बँकेचे आभार मानले.यावेळी
बँकेचे असिस्टंट मॅनेजर अक्षय सुतार,श्रीधर किणीकर,शरद जाधव,विठ्ठल खुटाण,प्रगती भोसले,अर्चना येसुगडे,वर्षा काटे,रोहित काटकर, आश्विनी कोष्टी,जयश्री जाधव,अर्चना कवठेकर,चंद्रभागा पाटील,वासंती लोहार आदी उपस्थित होते.